स्वप्नपूर्तीसाठी म्युच्युअल फंड लाभदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:31 PM2017-12-22T23:31:27+5:302017-12-22T23:32:29+5:30

‘बचतची सवय ही दिवस पाहून न करता ती ध्येय पाहून आजपासूनच सुरू करावी’, असे आवाहन आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडचे प्रशांत गुप्ता आणि नीलरत्न चौबळ यांनी केले.

Mutual Funds are beneficial for dreamers | स्वप्नपूर्तीसाठी म्युच्युअल फंड लाभदायी

स्वप्नपूर्तीसाठी म्युच्युअल फंड लाभदायी

Next
ठळक मुद्देइव्हेस्टमेंट मंत्र : लोकमत, आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड जागृती सेमिनार

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : ‘बचतची सवय ही दिवस पाहून न करता ती ध्येय पाहून आजपासूनच सुरू करावी’, असे आवाहन आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडचे प्रशांत गुप्ता आणि नीलरत्न चौबळ यांनी केले.
वाहतूक पोलीस शाखेजवळील हॉटेल सिद्धार्थ येथे ‘लोकमत’ आणि ‘आदित्य बिर्ला समूह’ यांच्या वतीने म्युच्युअल फंड मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, प्रसिद्ध आर्किटेक्चर स्वदेश गांधी, प्रसन्ना बोथरा उपस्थित होते. प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर म्युच्युअल फंडबाबत आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडचे महाराष्ट्र-गोवा प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत गुप्ता यांनी उपस्थिताना सखोल माहिती दिली.
गुप्ता म्हणाले, जितक्या लवकर बचतीची सुरुवात कराल, तितका फायदा तुम्हाला होणार आहे. खर्चाच्या नियोजनापेक्षा बचतीचे नियोजन महत्त्वाचे आहे. तसेच पैसे बचत कराताना रिस्क घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही रिस्क घेण्याचा निर्णय घेतला नाही तर रिस्क न घेणेच ही, रिस्क आहे. कमी वेळात जास्त पैसे मिळते, असे कुठे होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सुरुवातीपासूनच बचतीची सवय लावावी. काही जणांना एकाच ठिकाणी पैसे गुंतविण्याची सवय असते. मात्र हे योग्य नाही. म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे, असे सांगितले.
यावेळी गुप्ता यांनी बचतीची सवय लागण्यासाठी काय करावे, याचा संदेश देणारे काही व्हिडिओ नागरिकांना दाखविले. तसेच बचत केल्याचे फायदे आणि तोटेही उदाहरणासह नागरिकांना पटवून दिले.
आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड कार्पोरेट ट्रेनर नीलरत्न चौबळ म्हणाले, ‘आपण कोणतीही वस्तू नव्हे तर सुविधा विकत घेतो. कुठली स्किम माझ्याकडे लाभदायक आहे. हे समजणे प्रत्येकाला महत्त्वाचे आहे. इक्विटीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केली तर फायदा जास्त मिळतो. त्यासाठी ‘एसआयटी’ (सीसटॅमेटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन) महत्त्वाचा आहे. लवकरात लवकर बचत चालू करा. घरातील सर्व कुटुंबाला एकत्र करून ही बचतीची सवय लावा, असे सांगितले.
म्युच्युअल फंडमध्ये कशी गुंतवणूक करावी, याचे सुमारे दोन तास मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रशांत गुप्ता आणि नीलरत्न चौबळ यांनी उत्तरे देवून शंकाचे निरसन केले. या शिबिराला चंद्रपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कडूकर यांनी केले.
गुंतवणूक करताना घ्यायची काळजी
फंड प्रकाराप्रमाणे विभाजन : म्युच्युअल फंडात पुढील प्रकार प्रामुख्याने आहेत. मनी मार्केट फंड, गिल्ट फंड (फक्त गव्हर्नमेंट सिक्युरिटीज) मध्ये गुंतवणूक करताना डेन्ट फंड, बॅलन्स फंड, इक्विटी फंड.
आपल्या गुंतवणुकीची क्षमता कमी असली तरी आपण अगदी ५०० रुपयापासून गुंतवणूक करू शकता.
इक्विटी म्युच्युअल फंड हा दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे.
यात गुंतवणूक अधिक फायद्याची.

Web Title: Mutual Funds are beneficial for dreamers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.