त्या' वाघिणीच्या मृत्यूचे गूढ कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:39 AM2019-08-31T00:39:21+5:302019-08-31T00:40:49+5:30

विषबाधेतून मृत्यू झाला नाही, जी औषधी शोध मोहीम करताना सापडली ती तणनाशक असल्याचे सिद्ध होताच प्रकरण गुंतागुंतीचे झाले. आता कुणी विष प्रयोग केला की काय याचा शोध वनविभाग घेत आहे. ते उत्तरीय तपासाचा रिपोर्ट आल्यावरच कळणार आहे.

That 'mystery of the death of Tiger | त्या' वाघिणीच्या मृत्यूचे गूढ कायमच

त्या' वाघिणीच्या मृत्यूचे गूढ कायमच

Next
ठळक मुद्देपोडसा गावातील वाघिणीचे मृत्यू प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील पोडसा (जुना) शिवारात रानडुकर आणि वाघिणीचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे उघडकीस आले. या घटनेने वनविभाग हादरला असून युद्धपातळीवर तपास सुरू आहे. दरम्यान तीन महिन्यांपूर्वीसुद्धा विषारी द्रव्यामुळे म्हैस ठार झाली होती. या संदर्भात म्हैस मालकाने तक्रार नोंदवली. चार जणांवर लाठी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हाच धागा पकडून वनविभागाच्या चौकशी पथकाने तपासचक्रे फिरवल्याची माहिती आहे.
विषबाधेतून मृत्यू झाला नाही, जी औषधी शोध मोहीम करताना सापडली ती तणनाशक असल्याचे सिद्ध होताच प्रकरण गुंतागुंतीचे झाले. आता कुणी विष प्रयोग केला की काय याचा शोध वनविभाग घेत आहे. ते उत्तरीय तपासाचा रिपोर्ट आल्यावरच कळणार आहे. चौकशी संदर्भात रसिका शांताराम वाघाडे, दादाजी सोमा गुडपल्ले, जीवनदास शिवराम रायपुरे यांचे बयाण नोंदवण्यात आले आहे. अद्याप कुणावरही गुन्हे दाखल झालेले नाही. दरम्यान, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, निष्पक्ष चौकशी करा, शेतकऱ्यांवर दबाव टाकू नये, अन्याय खपवून घेणार नाही, ही भूमिका घेऊन संपूर्ण पोडसावासीय ४०० ते ५०० च्या संख्येनी वनपरिक्षेत्र धाबा कार्यालयावर धडकले. क्षेत्राचे आमदारांनीही गावकºयांच्या भावना ऐकून वनाधिकाºयांना निष्पक्ष चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.

अद्याप कुणावरही गुन्हे दाखल केले नसून गुन्हेगाराच्या दिशेने तपासणी चक्रे फिरवली आहेत. लवकरच आरोपी सापडेल. कुणावरही अन्याय होणार नाही.
-डी. एस. राऊतकर
वनपरिक्षेत्र अधिकारी, धाबा वनपरिक्षेत्र

Web Title: That 'mystery of the death of Tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ