मनोज अधिकारी हत्येचे रहस्य कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:27 AM2020-12-29T04:27:22+5:302020-12-29T04:27:22+5:30
चंद्रपूर : शहरातील बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र अद्यापही या प्रकरणाचे ...
चंद्रपूर : शहरातील बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र अद्यापही या प्रकरणाचे उलगडा करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले नाही. तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या सीमा दाभर्डे हिची पोलीस कोठडी संपल्याने तिला न्यायालयात हजर केले असता तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
१ ऑक्टोबर रोजी मनोज अधिकारी याची त्याच्या प्लॅटवर निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी नगरसेवक अजय सरकार, रवींद्र बैरागी, धनंजय देवनाथ याना अटक करण्यात आली होती. तर या प्रकरणातील चौथा आरोपी सीमा दाभर्डे फरार होती. तिच्या शोधार्थ पोलिसांनी दोन पथके तयार केली. ही पथके नागपूर येथे जाऊन परत आली. परंतु, तिचा थांगपत्ता लागला नाही. तीन महिन्यानंतर २४ डिसेंबर रोजी सीमा दाभर्डे हिला चंद्रपूर येथील तिच्या घरुन अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. शनिवारी तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. यावेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळून तिची कारागृहात रवानगी केली आहे. परंतु, अद्यापही हत्येचे कारण गुलदस्त्यात आहे.