माझी वसुंधरा अभियायासाठी नगर परिषद सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:42 AM2020-12-16T04:42:51+5:302020-12-16T04:42:51+5:30
ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत चालणाऱ्या माझी वसुंधरा या अभियानात बल्लारपूर नगर परिषद च्या हालचाली सुरू झाल्या ...
ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत चालणाऱ्या माझी वसुंधरा या अभियानात बल्लारपूर नगर परिषद च्या हालचाली सुरू झाल्या आहे. निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे. या संदर्भात नगर परिषद स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख मंगेश सोनटक्के म्हणाले, माझी वसुंधरा या अभियानातील पृथ्वी यामध्ये नवीन क्षेत्रात झाडे लावून वृक्षारोपण करणार, जुन्या ठिकाणी लावलेल्या झाडांचे संवर्धन करणार जल - यामध्ये नदी, नाल्याची स्वच्छता, अग्नी -या अंतर्गत सौर ऊर्जा, एलएडी दिवे लावून, सोलर सिस्टम लावण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणे, वायू - यामध्ये धूर प्रतिबंधासाठी उपाय योजना करणार आहोत. तर आकाशच्या माध्यमातून पर्यावरण सुधारणा, प्रदूषण कमी करायचे आहे. व पंचत्वाच्या संरक्षणासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करावयाचे आहे.
कोट
माझी वसुंधरा ही मोहीम सुरू झाली असून या अभियानाअंतर्गत आम्ही ऐतिहासिक किल्ला परिसरातील सफाई करून मोहिमेला सुरुवात केली. आता लोकसहभागाने हे अभियान यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
- विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी,नगर परिषद बल्लारपूर.