नागभीडमध्ये ६०० कर्मचारी सांभाळणार निवडणुकीचे काम.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:24 AM2020-12-23T04:24:42+5:302020-12-23T04:24:42+5:30
नुकतेच प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामपंचायातींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला. यात नागभीड तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचा समावेश ...
नुकतेच प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामपंचायातींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला. यात नागभीड तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.या निवडणुका १५ जानेवारी २०२१ रोजी होत आहेत. नागभीड तालुक्यात या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या मतदार यादीनुसार ६६ हजार २७२ मतदार आहेत.
नागभीड तालुक्यात पूर्वी ६५ ग्रामपंचायती होत्या .यातील ९ ग्रामपंचायतींचा समावेश नागभीड नगर परिषदेत करण्यात आल्याने आता तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच पार पडल्या असल्याने आता ४३ ग्रामंचायतींच्या निवडणुका होत आहेत. वास्तविक यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ऑगष्ट महिन्यातच पार पडल्या असत्या. या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली होती. वार्ड निश्चितीपासून तर वार्डातील आरक्षणापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. आता निवडणूक टप्प्यात आल्याने राजकीय हालचालींनी चांगलीच गती घेतली आहे.