घरकुल योजनेत नागभीड पंचायत समिती जिल्ह्यात दुसरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:34 AM2021-08-18T04:34:08+5:302021-08-18T04:34:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : स्वतःचे घर असावे असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते, मात्र हे स्वप्न साकार करण्याची प्रत्येकाची ...

Nagbhid Panchayat Samiti second in Gharkul scheme in the district | घरकुल योजनेत नागभीड पंचायत समिती जिल्ह्यात दुसरी

घरकुल योजनेत नागभीड पंचायत समिती जिल्ह्यात दुसरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागभीड : स्वतःचे घर असावे असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते, मात्र हे स्वप्न साकार करण्याची प्रत्येकाची कुवत नसते. अशा व्यक्तींच्या मदतीला शासनाच्या विविध योजना धावून येत असून, या योजनांच्या माध्यमातून घरकुलाची स्वप्नपूर्ती होत आहे. गेल्या तीन वर्षांत नागभीड तालुक्यात अशाप्रकारे १ हजार ९४३ व्यक्तींची स्वप्नपूर्ती झाली आहे.

तालुक्यात घरकुलांची कामे बऱ्यापैकी होत आहेत. नागभीड तालुक्यास गेल्या तीन वर्षांत २ हजार ६०२ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी १ हजार ९४३ घरकुले पूर्ण झाल्याची माहिती आहे. उर्वरित अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. रेतीची टंचाई नसती तर या घरकुलांमध्ये आणखी भर पडली असती. २०२२ पर्यंत कुणीही बेघर राहू नये असे शासनाचे धोरण असून, त्यादृष्टीने शासनाचे नियोजन सुरू आहे.

माहितीनुसार, नागभीड पंचायत समिती अंतर्गत पंतप्रधान घरकुल योजनेचे २०१६ -१७ मध्ये ५०६ घरकुलांचे नागभीड पंचायत समितीस उद्दिष्ट होते. यापैकी ४९२ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. २०१७ - १८ मध्ये २९३ घरकुलांपैकी २८३, २०१८-१९ मध्ये १५४ पैकी १४२, २०१९ -२० मध्ये ७२६ पैकी ५४८ तर २०२०-२१ मध्ये १०८६ पैकी ४७६ घरकुल पूर्ण झाले आहेत. शबरी घरकुल योजनेत २०१६ - १७ ते २०१९ - २० या आर्थिक वर्षांमध्ये २३६ घरकुलांचे लक्ष होते. यापैकी १७५ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. रमाई घरकूल योजनेत २०१६ - १७ ते २०१९ - २० या आर्थिक वर्षात ११०३ घरकुलांचे लक्ष्य या पंचायत समितीला प्राप्त झाले होते. या लक्ष्यापैकी ५६२ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.

नागभीड पं. स. जिल्ह्यात द्वितीय

या घरकुल योजनेत नागभीड पंचायत समितीने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने घेतली आहे. राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमनिहाय प्रगतीनुसार गुणांकनाप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट तालुक्यात नागभीड पंचायत समितीस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या पुरस्काराचे वितरण स्वातंत्र्य दिनाचे दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. नागभीड पंचायत समितीचे सभापती प्रफुल्ल खापर्डे आणि गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

हे टीमवर्क आहे. योजनेंतर्गत घरकुलांची कामे मार्गी लागावेत यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. घरकुल विभाग, पंचायत विभाग, अनेक संपर्क अधिकारी यांचे मोठे योगदान आहे. या सर्वांच्या योगदानामुळे हे यश प्राप्त झाले.

- प्रणाली खोचरे, गटविकास अधिकारी, पं. स., नागभीड

170821\img-20210817-wa0039.jpg

पुरस्कार स्विकारतांना सभापती खापर्डे, गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे

Web Title: Nagbhid Panchayat Samiti second in Gharkul scheme in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.