नागभीडचा राम ‘एमपीएससी’ उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:31 PM2019-02-17T22:31:32+5:302019-02-17T22:31:50+5:30
घरची परिस्थिती अतिशय प्रतीकूल, बसायला धड जागा नाही, पण अशाही परिस्थितीत नागभीडच्या राम चौधरीने ‘एमपीएसस’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. नागभीडचा हा राम कक्ष अधिकारी म्हणून लवकरच रूजू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : घरची परिस्थिती अतिशय प्रतीकूल, बसायला धड जागा नाही, पण अशाही परिस्थितीत नागभीडच्या राम चौधरीने ‘एमपीएसस’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. नागभीडचा हा राम कक्ष अधिकारी म्हणून लवकरच रूजू होणार आहे.
रामचे चौथीपर्यंतचे शिक्षण मराठी शाळेत झाले. बारावी जनता विद्यालयात पूर्ण केली. इंजिनिअरिंग अमरावतीला केल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेकडे वळला. आतापर्यंत स्पर्धा परीक्षेच्या ४ व इतर ४ परीक्षा उत्तीर्ण केल्या असून राम सध्या एका बँकेत नोकरी करीत आहे.
नुकताच स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात नागभीडच्या रामने कक्ष अधिकारी या पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. रामचे वडील अपंग असून मिळेल ते काम करतात. लहान भाऊ वडिलास मदत करतो. राम ही नोकरी स्विकारुनही जिद्दीने अभ्यास करणार असून जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी पद मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.