नागभीड तालुक्यात १०,४६९ व्यक्तींनी टोचली कोविडची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:45+5:302021-04-28T04:30:45+5:30
या लसीबद्दल प्रारंभी सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, प्रारंभी सार्वजनिक क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींनाच ही लस देण्यात आली. यात आरोग्य सेवक, ...
या लसीबद्दल प्रारंभी सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, प्रारंभी सार्वजनिक क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींनाच ही लस देण्यात आली. यात आरोग्य सेवक, शासकीय डाॅक्टर, खासगी दवाखान्यातील डाॅक्टर व त्यांचे मदतनीस, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलातील जवान यांचा यात समावेश होता. त्यानंतर प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून ही लस सार्वजनिक करण्यात आली आहे. ४५ वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही व्यक्तीस ही लस देण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार २७ एप्रिलपर्यंत तालुक्यात १० हजार ४६९ व्यक्तींनी ही लस टोचून घेतली आहे. यात नागभीड ग्रामीण रुग्णालय ४ हजार ७५०, नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्र १ हजार १६, मौशी प्राथमिक आरोग्य केंद्र ५९९, बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र ४०९, वाढोणा प्राथमिक आरोग्य केंद्र १ हजार २६० आणि तळोधी प्राथमिक आरोग्य केंद्रातून २ हजार ४०६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती आहे.
कोट
आतापर्यंत १० हजार ४६९ व्यक्तींना ही लस देण्यात आली. कोविडच्या निर्मूलनासाठी प्रत्येकाने लस घेणे जरुरीचे आहे. डाॅ. श्रीकांत कामडी, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, नागभीड.