नागभीड, वरोरा, कोरपना बीडीओंच्या सेवा परत घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 05:00 AM2020-12-11T05:00:00+5:302020-12-11T05:00:14+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिले, सभापती नागराज गेडाम, राजू गायकवाड, सुनील उरकुडे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या सभेत नागभीड, कोरपना आणि वरोरा येथील संवर्ग विकास अधिकाऱ्याच्या मनमानीविरूध्द भाजपचे गटनेते देवराव भोंगळे, काँंग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर व डॉ. आसावरी देवतळे यांनी प्रश्न उपस्थित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना न जुमानता मनमर्जीने काम करणाºया नागभीड, वरोरा आणि कोरपना येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांची सेवा शासनाला परत करण्याचा ठराव मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. वसंत भवनातील नियमांचा भंग करणाºया गाळेधारकांना नोटीस देण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आलेे. कोरोना काळातील स्थायी समितीची सभागृहात झालेली ही पहिलीच सभा असल्यामुळे या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिले, सभापती नागराज गेडाम, राजू गायकवाड, सुनील उरकुडे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या सभेत नागभीड, कोरपना आणि वरोरा येथील संवर्ग विकास अधिकाऱ्याच्या मनमानीविरूध्द भाजपचे गटनेते देवराव भोंगळे, काँंग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर व डॉ. आसावरी देवतळे यांनी प्रश्न उपस्थित केला. कोरपनाचे बीडीओ बाबाराव पाचपाटील यांनी धानोली येथे गेल्या पाच वर्षांत १९ ग्रामसेवक बदलवून विक्रम केला. नागभीडच्या बीडिओ प्रणाली खोचरे तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये भेदभाव करीत असून अनेक कामांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला. वरोºयाचे बीडिओ संजय बोदले यांनी जिल्हा परिषदेकडून आलेल्या यादीनुसार कचराकुंड्यांचे वाटप न करता इतर ग्रामपंचायतींना वितरण केले. या संदर्भात वरिष्ठ अधिकाºयांकडून वारंवार बीडिओंना समाज दिली. पण, सुधारणा न झाल्याने लोकप्रतिनिधींनी मंगळवारी स्थायी समितीत त्यांच्या सेवा परतीचा ठराव घेतला. यापूर्वी नागभीडच्या बीडिओ खोचरे यांच्या सेवा परतीचा ठराव घेण्यात आला होता. दरम्यान संबंधित बीडिओ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचेही ऐकत नसल्याची चर्चा सुरू होती.जिल्हा परिषदेत गेल्या काही महिन्यांपासून वसंत भवनाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्यावर संजय गजपुरे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर तोडगा काढण्यासाठी नियमबाह्यरित्या ठाण मांडून बसलेल्या गाळेधारकांना नोटीस देण्यावर शिक्कामार्तब करण्यात आले. मात्र, जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या वकिलाला काढून दुसरा वकील नेमण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.
१२१ अंगणवाडी केंद्रांचे होणार निर्लेखन
काही महिन्यांतच बांधकाम होणाऱ्या १२१ अंगणवाड्यांचे निर्लेखन करण्याचा ठराव घेण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्याने रूग्ण कल्याण समितीचे प्रोसेडिंग गायब करून केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्याचाही निर्णय झाला. स माजकल्याण सभापती नागराज गेडाम यांनी ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येत असलेल्या ई-निविदा सदोष असल्याचा मुद्दाही उपस्थित केला होता. याबाबतची चौकशी केली जाणार असल्याचे आश्वासन जि. प. अध्यक्ष गुरूनुले यांनी दिले.