नागलोन खुल्या कोळसा खाणीमुळे माजरीकरांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:06 PM2018-09-04T23:06:36+5:302018-09-04T23:06:54+5:30
वेकोलि माजरीच्या नागलोन खुल्या कोळसा खदान हे माजरी वॉर्ड नं. १ व दफाई नं. १ ला लागून आहे. वेकोलि कोळसा उत्पादनाकरिता कंपनीने मातीचे ढिगारे उभारले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. हे पाणी साचून राहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : वेकोलि माजरीच्या नागलोन खुल्या कोळसा खदान हे माजरी वॉर्ड नं. १ व दफाई नं. १ ला लागून आहे. वेकोलि कोळसा उत्पादनाकरिता कंपनीने मातीचे ढिगारे उभारले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. हे पाणी साचून राहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच ब्लॉस्टिंगमुळे घरांनाही भेगा पडत असल्याने घरे कोसळण्याच्या मार्गावर आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील समस्यांवर कायस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी जि. प. सदस्य प्रवीण सुरु यांनी निवेदनातून केली आहे.
वेकोलि नागलोन खुल्या कोळसा खाणीमध्ये कोळसा उत्पादनाकरिता मोठ्या तिव्रतेची ब्लास्टिंग करण्यात येत असते. या ब्लास्टिंगमुळे अनेकांची घरे कोसळली आहेत.
अनेकांच्या घराच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. या अतितिव्र ब्लास्टिंगमुळे घराच्या भिंती कोसळल्याने जीवित हानी होण्याची शक्यता आहे. तर कोळशाच्या धुळीने दफाई नंबर एकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. तर मातीच्या ढिगाºयामुळे पाणी साचून राहल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबतची तक्रार परिसरातील नागरिकांनी वेकोलि माजरीचे अधिकारी तसेच तहसिलदाराकडे निवेदनातून केली. दरम्यान, वेकोलि अधिकारी व तहसिलदारांनी मौका चौकशी करून नुकसान भरपाई व घराचे दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. मात्र आजतगाजत या लोकांना कुठल्याच प्रकारची मदत मिळाली नाही. त्यामुळे माजरी जि. प. पाटाळाचे सदस्य प्रवीण सुर यांनी वेकोलि प्रशासन व तहसीलदार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हाधिकारी व वेकोलि नागपूरचे खाण निर्देशक यांना निवेदनातून कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.