राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत नागपूर विभाग विजयी
By admin | Published: January 22, 2017 12:58 AM2017-01-22T00:58:20+5:302017-01-22T00:58:20+5:30
चंद्रपूर जिल्हा मल्टीपर्पज व्हॉलीबॉल असोसिएशन व लोक शिक्षण संस्था वरोराच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनीअर व्हॉलीबॉल स्पर्धेत पहिल्या दिवशी मुले व मुलीच्या नागपूर विभागीय संघ विजेते ठरले.
राज्यातील अनेक संघाचा सहभाग : व्हॉलिबॉल असोसिएशनचे आयोजन
वरोरा : चंद्रपूर जिल्हा मल्टीपर्पज व्हॉलीबॉल असोसिएशन व लोक शिक्षण संस्था वरोराच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनीअर व्हॉलीबॉल स्पर्धेत पहिल्या दिवशी मुले व मुलीच्या नागपूर विभागीय संघ विजेते ठरले.
सदर स्पर्धेचे उदघाटन वरोरा न.प अध्यक्ष अहेतेश्याम अली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री संजय देवतळे, नगरसेविका सुनिता काकडे, नगरसेवक गणराज भिवदरे, नरेंद्र जिवतोडे, डॉ. आर.आर. महाजन, राज्य व्हॉलीबाल संघटनेचे मनमन पालने, अर्शद काजी, निकुंब, सुरेश पाचपोर, हेमंत गिते, अशोक बिसेन, महेश राऊत आदी उपस्थित होते. लोक शिक्षण संस्था वरोराच्या प्रांगणात उभारलेल्या दोन मैदानावर व्हॉलीबॉल स्पर्धा सुरू असुन महाराष्ट्रातील मुला-मुलीचे १६ संघ सहभागी झाले आहे. बिड येथील ज्येष्ठ व्हॉलीबॉल खेळाडू शकील हे स्पर्धेचे निरीक्षक म्हणून उपस्थित आहे. उद्घाटनानंतर झालेल्या सामन्यात मुलांमध्ये नागपूरच्या संघानी नाशिकच्या संघावर दोन शुन्यनी मात केली. पुणे संघाने औरंगाबाद संघावर दोन शुन्यनी मात केली. तर मुलीमध्ये नागपूर संघाने औरंगाबाद संघावर दोन शुन्य व पुणे संघाने लातुर संघावर दोन शुन्यनी मात करून विजय मिळविला. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन विनोद उमरे यांनी तर आभार गजानन जिवतोडे यांनी मानले. स्पर्धेचे बक्षीस वितरण २२ जानेवारी रोज रात्री ७ वाजता करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)