संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे आजीवन प्रचारक नामदेव लांडगे यांचे निधन.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:25 AM2020-12-23T04:25:13+5:302020-12-23T04:25:13+5:30
संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे आजीवन प्रचारक नामदेव लांडगे यांचे निधन. संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या मानवतावादी तत्वज्ञानाचे आजीवन ...
संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे आजीवन प्रचारक नामदेव लांडगे यांचे निधन.
संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या मानवतावादी तत्वज्ञानाचे आजीवन अंगीकार करणारे चर्मकार समाजातील आधारस्तंभ नामदेव लांडगे( ८० रा.तुकूम चंद्रपुर)यांचे सोमवारी सायंकाळी ६-०० वा. वृद्धापकाळाने निधन झाले.
मुळचे चंद्रपूर येथील रहिवासी होते. ते सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थे च्या वठोली ता. गोंडपिपरी शाळेत मुख्याध्यापक पदी कार्यरत होते दरम्यान संत रविदास महाराज यांच्या विचाराशी त्यांचा परिचय झाला ते समाजकार्यात व चळवळीत सक्रिय काम करू लागले जवळपास तीस वर्षांपूर्वी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय संत रविदास जयंती व समाजाचा मेळावा घेतला चर्मकार समाजाला संघटित करण्याकरिता त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले या कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले त्यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली, त्यांचा उत्साह आज पण तेवढ्या दांडगा होता नुकतेच चंद्रपूर जिल्हा चर्मकार समाज कृती समिती व गुरुदास फाउंडेशन चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय संत रविदास जयंती वधु वर परिचय मेळावा घेण्यात आला तेव्हा त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले त्यांचा समाजाच्या वतीने सत्कार सुद्धा करण्यात आला
त्या निधनामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील समाज बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी व नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.