सभागृहाला राजे भीम बल्लारशाह नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:36 PM2019-01-27T22:36:51+5:302019-01-27T22:37:27+5:30

शहराला गोंडी राजवटीचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंड राजाच्या वैभवशाली वास्तू आजही उभ्या आहेत, आदिवासीच्या पूर्वजांचे अस्तित्व शहरात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

Name the Raje Bhima Ballarshah in the House | सभागृहाला राजे भीम बल्लारशाह नाव द्या

सभागृहाला राजे भीम बल्लारशाह नाव द्या

Next
ठळक मुद्देआदिवासी संघटनांची मागणी : बल्लारपुरात धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : शहराला गोंडी राजवटीचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंड राजाच्या वैभवशाली वास्तू आजही उभ्या आहेत, आदिवासीच्या पूर्वजांचे अस्तित्व शहरात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याकडे प्रशासनाचे व सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. हा आदिवासी समाजावर अन्याय आहे. अन्यायाकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी व सांस्कृतिक सभागृहाला राजे भीम खांडक्या बल्लारशाह यांचे नाव द्या व अन्य मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
एकेकाळी हे शहर खांडक्या बल्लाळशाह या गोंड राजाच्या नावारुन बल्लारशाह गोंडी साम्राज्याची साक्ष देत होते. परंतु, गोंड राजाचा वैभवशाली इतिहास दडपून टाकण्यासाठी बल्लाळशाह यांच्या समाधी स्थळाकडे आजही दुर्लक्ष केले जात आहे. वर्धा नदीकाठावरी किल्ल्याचे सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे. आदिवासी व गोंड संस्कृतीचे उच्चाटन करण्यासाठी शहराचे नाव बल्लारशाह ऐवजी बल्लारपूर असे करण्यात आले. यामुळे आदिवासी समाजात संताप व्यक्त केला जात आहे. हा समाज संघटित नसल्यामुळे प्रशासन शासन दखल घेत नाही. यासाठी समाज बांधवांनी न्याय हक्क मिळविण्यासाठी एकत्र येत संघर्ष करण्याची मानसिकता तयार करावी, असे आवाहन धरणे आंदोलन दरम्यान पदाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी येथील तहसीलदार विकास अहीर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात बल्लारपूर येथील शिवाजी वॉर्डातील जागा कुवारा भिवसन देवस्थानला द्या, खाडक्या बल्लाळशाह यांच्या समाधी स्थळाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, शहराचा नामोल्लेख पूर्वीप्रमाणे बल्लारशाह असाच करावा, टीएमएनडी चौकाला वीर बाबुराव शेडमाके चौक असे नाव द्यावे, नवीन बस स्थानक चौकाला भगवान बिरसामुंडा चौक असे नामकरण करावे, त्याच प्रमाणे नव्याने उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाला भीम बल्लाळशाह नाव देण्याची मागणी आदिजन चेतना जागर, अखिल भारतीय आदिवासी सेना, गोंडीयन सामाजिक संस्था, आदिवासी अस्तित्व रक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांनी केले, धरणे आंदोलनात मोठ्या संख्येनी समाज बांधव सहभागी झाले होते.

Web Title: Name the Raje Bhima Ballarshah in the House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.