प्राणिसंग्रहालयाला गोंडवाना नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:26 AM2021-02-12T04:26:45+5:302021-02-12T04:26:45+5:30
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने नागपूर येथे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. २६ ...
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने नागपूर येथे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. २६ जानेवारीला मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांनी त्या फलकाचे अनावरण केले. त्याचवेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना नागपूर येथे काळे झेंडे दाखवून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. आता हे आंदोलन विदर्भाच्या ११ जिल्हा व तालुका स्तरावर होत आहे. शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी १५ फेब्रुवारीला सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत चंद्रपूर व तालुका स्थळी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वतीने माजी आमदार ॲड. वामनराव चटप, संयोजक राम नेवले, महिला आघाडी प्रमुख रंजना मामर्डे, ॲड. मो.वि. टेमूर्डे, डॉ.श्रीनिवास खांदेवाले, डॉ. रमेश गजबे, प्रबीरकुमार चक्रवर्ती, मुकेश मासुरकर, किशोर पोतनवार, किशोर दहिकर, हिराचंद बोरकुटे, प्रभाकर दिवे, मितीन भागवत,अंकुश वाघमारे,मुन्ना आवळे, सुदाम राठोड, सतीश पवार, ॲड. शरद कारेकर, सुधीर सातपुते,सचिन सरपटवार अरुण वासलवार, नीलकंठ कोरांगे,ॲड. चैताली कटलावार, सारिका उराडे, रमेश राजूरकर, कवडू येनाप्रेडीवार, मनोहर गेडाम, गोपाळ रायपुरे,विकास बोरकर, लीना जोगे,योगिता लांडगे, आशिष घुमे,पराग गुंडेवार,गौतम कांबळे यांनी केले आहे.