नांदेडचे दादाजी खोब्रागडे पाठ्यपुस्तकात

By admin | Published: April 28, 2016 12:41 AM2016-04-28T00:41:29+5:302016-04-28T00:41:29+5:30

नागभीड तालुक्यातील नांदेड येथील एचएमटी या धानाचे जनक दादाजी रामजी खोब्रागडे यांच्यावर इयत्ता ६ वीच्या थोरांची ओळख या पाठ्यपुस्तकात एक पाठ घेण्यात आला आहे.

Nanded's grandfather Khobragade textbook | नांदेडचे दादाजी खोब्रागडे पाठ्यपुस्तकात

नांदेडचे दादाजी खोब्रागडे पाठ्यपुस्तकात

Next

घनश्याम नवघडे नागभीड
नागभीड तालुक्यातील नांदेड येथील एचएमटी या धानाचे जनक दादाजी रामजी खोब्रागडे यांच्यावर इयत्ता ६ वीच्या थोरांची ओळख या पाठ्यपुस्तकात एक पाठ घेण्यात आला आहे.
नांदेड येथील दादाजी रामाजी खोब्रागडे यांच्याकडे केवळ दीड एकर शेती असून या दीड एकर शेतीत धानावर विविध प्रयोग केले. केवळ तीन इयत्ता शिकलेल्या दादाजीचे हे प्रयोग एखाद्या कृषी विद्यापीठात गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या प्राध्यापकालाही लाजवणारे आहेत.
१९८५ ते ९० या कालावधीत त्यांनी एचएमटी या धानाची जात विकसित केली. धानाच्या या जातीला एवढी मान्यता व प्रसिद्धी मिळाली की, धानाच्या या जातीने अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यानंतर खोब्रागडे यांनी धानाच्या अनेक जाती विकसित केल्या. पण जी मान्यता एचएमटीला प्राप्त झाली ती मान्यता मात्र धानाच्या इतर प्रजातींना मिळू शकली नाही.
खोब्रागडे यांच्या या संशोधनाची दखल फोर्ब्स या जागतिक संस्थेनेही घेतली. त्यानंतर खोब्रागडे यांना विविध मानसन्मान मिळाले. आता तर खोब्रागडे यांच्या कार्याची दखल पाठ्यक्रमानेही घेतली आहे. इयत्ता ६ वी थोरांची ओळख या पाठ्यपुस्तकात खोब्रागडे यांच्यावर एक पाठच समाविष्ट केला आहे. या पाठात खोब्रागडे यांनी एचएमटी या धानाचा शोध कसा लावला, याची माहिती दिली. (तालुका प्रतिनिधी)

दादाजी रामजी खोब्रागडे यांच्यावर इयत्ता ६ वीच्या थोरांची ओळख या पुस्तकात एक पाठ घेण्यात आला आहे. नागभीड तालुक्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे.
- प्रदीप उपलंचीवार
भाग शिक्षणाधिकारी, पं.स. नागभीड

Web Title: Nanded's grandfather Khobragade textbook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.