‘नटरंगी नार’ने रसिकांना लावले वेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2017 12:34 AM2017-03-02T00:34:33+5:302017-03-02T00:34:33+5:30

भारतीय लावणी सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी आपल्या एकापेक्षा एक अशा दमदार लावण्यांनी भद्रावतीकरांना अक्षरश: वेडे केले.

'Natarangi Narar' brought the audience to the wade | ‘नटरंगी नार’ने रसिकांना लावले वेड

‘नटरंगी नार’ने रसिकांना लावले वेड

Next

सखी मंच भद्रावतीचे आयोजन : सुरेखा पुणेकर यांनी सादर केल्या दमदार लावण्या
भद्रावती : भारतीय लावणी सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी आपल्या एकापेक्षा एक अशा दमदार लावण्यांनी भद्रावतीकरांना अक्षरश: वेडे केले. प्रत्येक लावणीला मिळणाऱ्या टाळ्या व शिट्यांची रसिकांची दाद प्रशंसनीय होती. अशा या बहारदार कार्यक्रमात रसिकही मोठ्या प्रमाणात थिरकले. लोकमत सखी मंच भद्रावतीतर्फे भद्रावतीच्या सखींसाठी तसेच आमंत्रितांसाठी ‘नटरंगी नार’ हा लावणीचा बहारदार कार्यक्रम स्थानिक शिंदे मंगल कार्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
गणपती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रसिकांना मानाचा मुजरा दिल्यानंतर खऱ्या अर्थाने लावण्या सादर करण्यात आल्या. या रावजी बसा भाऊजी, नंतर पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, या सुरेखा पुणेकर यांनी सादर केलेल्या दोन्ही लावण्यांना रसिकांनी शिट्ट्या व टाळ्यांनी दाद दिली. ‘बाई मी लाडाची हो लाडाची कैरी पाडाची,’ ‘पाडाला पिकलाय आंबा’ या व विविध खड्या व बैठ्या लावण्या त्यांनी सादर केल्या. शेवटी देविला नमन करीत सैराटच्या ‘झिंग झिंग झिंगाट’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सखी मंचच्या सदस्यांसाठी मंचावरूनच लकी ड्रा काढण्यात आला.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, आ. बाळू धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार सचिन कुमावत, ठाणेदार विलास निकम, मुख्याधिकारी विनोद जाधव, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख विनोद बुले, सखी जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे, प्रा. सचिन सरपटवार, इव्हेंट मॅनेजर अमोल कडूकर सखी मंचच्या तालुका संयोजिका अल्का वाटकर, सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर, सामाजिक कार्यकर्ते नागोबा बहादे, अजय पद्मावार, मंदा तराळे, डॉ.यशवंत घुमे, विनायक येसेकर, प्रा. विनोद घोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अमोल कडूकर, प्रास्ताविक प्रा. सचिन सरपटवार, सखी मंचच्या कार्याचे वाचन अल्का वाटेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका संयोजिका अल्का वाटकर, वर्षा पढाल, तृप्ती हिरदेवे, अर्चना कुळकर्णी, मनिषा बोरकर, नेत्रा इंगुलवार, राजश्री बत्तीनवार, जयश्री बत्तीनवार, जयश्री कामडी, सुनीता अडबाले, पुजा देवाईकर, शिला कातकर, मंगला घोंगडे, स्वाती चारी, नेहा बन्सोड, कल्पना मत्ते यांच्यास अन्य सखी सदस्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

यांचे विशेष सहकार्य
या कार्यक्रमासाठी भद्रावती शहरातील सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर, अजय पद्मावार, जैन मंदीर व्यवस्थापन, भीकमचंद बोरा, नागोबा बहादे, मंदा तराळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
लकी ड्रॉसाठी यांचे सहकार्य
प्रथम पारितोषिक विजेच्या सखीला ओंकार ज्वेलर्स भद्रावतीतर्फे एक ग्रॅम नेकलेस सेट तर द्वितीय विजेत्या सखीला ओंकार ज्वेलर्स कडूनच एक ग्रॅमचे मंगळसुत्र, तृतीय बक्षीस रंगोली साडी सेंटरकडून पैठणी, चतुर्थ भोयर मेटल्सकडून डायनिंग सेट, पाचवे बक्षीस अनुराधा कलेक्शन कडून आकर्षक साडी, सहावे गजानन वस्त्र भंडार कडून आकर्षक साडी, सातवे पारितोषिक जैन बुटीक यांच्याकडून नेकलेस देण्यात आले.
या ठरल्या बक्षिसाच्या मानकरी
प्रथम बक्षीस सरिता वाटेकर, द्वितीय चौधरी, तृतीय सुनीता कामतकर, चतुर्थ प्रतिभा कांबळी, पाचवे बक्षीस नंदा मत्ते, सहावे बक्षीस विजया अनाशी व सातवे बक्षीस मनीषा क्षीरसागर यांना देण्यात आले.

Web Title: 'Natarangi Narar' brought the audience to the wade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.