एकवटलेले गाव झाले अनाथांसाठी नाथ

By admin | Published: June 16, 2014 11:24 PM2014-06-16T23:24:23+5:302014-06-16T23:24:23+5:30

तिच्या बालपणी कुटुंब सर्वसामान्यासारखे होते. पण समज आल्यानंतर नियतीचे चक्र फिरले. आई वेडी झाली. वडीलांचे छत्र आजारपणात हरपले. परिस्थिती दयनिय झाली. तशी तिला व भावंडांना वेगळी वागणूक मिळू लागली.

Nath for the orphaned village | एकवटलेले गाव झाले अनाथांसाठी नाथ

एकवटलेले गाव झाले अनाथांसाठी नाथ

Next

लोकवर्गणीतून लग्न : अनाथ मुलीच्या मदतीला धावली माणुसकी
अनेकश्वर मेश्राम - बल्लारपूर
तिच्या बालपणी कुटुंब सर्वसामान्यासारखे होते. पण समज आल्यानंतर नियतीचे चक्र फिरले. आई वेडी झाली. वडीलांचे छत्र आजारपणात हरपले. परिस्थिती दयनिय झाली. तशी तिला व भावंडांना वेगळी वागणूक मिळू लागली. अशातच आयुष्याच्या अंधारात चाचपडत असताना जोडीदार मिळाला. पण परिस्थिती आड येत होती. अखेर अनाथ मुलीच्या मदतीला माणुसकी धावली. बल्लारपूर तालुक्यातील विसापूरकरांनी सामाजिक बांधिलकी जोपासून लोकवर्गणीच्या माध्यमातून तिचा काल गुरुवारी थाटात विवाह लावून दिला.
रंजना असे या अनाथ मुलीचे नाव. एकेकाळी रंजनाचे वडील पांडुरंग पुणेकर दुकान व्यावसायिक होते. आई सरिता शिक्षित होती. योगेश व दीपक दोन भावंडे होती. सुखी कुटुंब म्हणून संसाराचा गाडा सुरळीत सुरू होता. भावी सुखी व समाधानी जीवनाचे स्वप्न पाहत असलेल्या कुटुंबाला दृष्ट लागली. आई सरिताला आजारपणाने घेरले. यामुळे तिच्या वडीलांची अस्वस्थ राहू लागले.
पत्नी सरिताच्या आजारपणावरील खर्च जसजसा वाढत गेला. तसतसा दुकान व्यवसाय डबघाईस येऊ लागला. परिणामी पत्नीचे आजारपण व तीन मुलांचा सांभाळ करतानाच एकेदिवशी पांडुरंग पुणेकर यांचे निधन झाले. कुटुंबाची सर्व जबाबदारी रंजना हिलाच पेलावी लागली. यासाठी तिला शिक्षणाकडे पाठ फिरवावी लागली. काही महिन्यातच पाठचा भाऊ योगेशवर काळाने झडप घातली. तेव्हापासून वेडसरपणात वावरणारी आई सरिता व मंदबुद्धीचा लहान भाऊ दीपक व अपंग विवेक यांचा सांभाळ रंजना आजतागयत हालअपेष्टा सहन करुन करीत आहे.
दरम्यान आयुष्याच्या ओझ्याखाली जीवन जगत असताना विजय सोयाम नावाच्या तरुणाशी तिची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर लग्नसंबंधात करण्याचे दोघांनी ठरविले. परंतु मार्ग सापडत नव्हता. हातात दमडीही नव्हती. अशातच अपंग असलेला पानटपरी चालक गणेश करमनकर यांना ही वार्ता कळली. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितले. गावकऱ्यांनी अनाथ मुलीच्या लग्नासाठी मदत द्या, अशा आशयाचे दोन फलक लावले. फलक पाहून सामाजिक जाणिवेतून काहींनी मदत दिली.
चंद्रपूर येथील शरद राजने, पी.के. जैन, अ‍ॅड. प्रकाश गजबे, वसंत उपरे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, बाबन परसूटकर, मधुकर भोयर, शंकर तेलंग, शालीकराम भोजेकर, मीना सादराणी, अण्णा सुंदरगिरी, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मारोती गावंडे, तुळशिराम गोरे, सुभाष हरणे, अरुण जगताप, वैभव मेशाम, फोटोग्राफर राजूसिंग, प्रभाकर टोंगे, मदन बुरचुंडे, दादाजी जीवने, ऋषी गिरडकर, शामराव देठे, परमेश्वर पुणेकर आदींंनी अनाथ रंजनाच्या लग्नासाठी मदतीचा हातभार लावला.

Web Title: Nath for the orphaned village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.