बीएसएनएलच्या सेवेची राष्ट्राला गरज -कुणाल खेमणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:00 AM2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:32+5:30
अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात, बँक सेक्टर, डिफेंसमध्ये सेवा पुरविली जाते. गोपनियता तथा विश्वास बीएसएनएलमध्ये पाळली जातो. त्यामुळे बीएसएनएलची तुलना कोणत्याही खासगी कंपनीशी होऊ शकत नाही. म्हणूनच बीएसएनएलच्या सेवेची राष्ट्राला गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बीएसएनएलचा प्रत्येक भारतीयांशी संबंध आहे. प्रत्येकांचे कौटुंबिक नाते जुडलेले आहे. बीएसएनएलचा उद्देश केवळ नफा कमविणे नसून भारतातील ग्रामीण भागात, दऱ्या खोऱ्यात, राष्ट्रीय आफतीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये सेवा पुरविणे हा आहे. अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात, बँक सेक्टर, डिफेंसमध्ये सेवा पुरविली जाते. गोपनियता तथा विश्वास बीएसएनएलमध्ये पाळली जातो. त्यामुळे बीएसएनएलची तुलना कोणत्याही खासगी कंपनीशी होऊ शकत नाही. म्हणूनच बीएसएनएलच्या सेवेची राष्ट्राला गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले.
बीएसएनएल वर्धापन दिन कार्यक्रम बीएसएनएलचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयोजित केला होता. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीएसएनएलचे महाप्रबंधक अरविंद पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमहाप्रबंधक आर.एम. कोजबे उपस्थित होते. यावेळी बीएसएनएलमधील उत्कृष्ठ सेवा व कार्य देणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील यांनी सन १८९१ ते २०११ पर्यंतचा डीओटी ते बीएसएनएलच्या प्रवासाची माहिती दिली. तर कोजबे यांनी शासनाच्या धोरण व बीएसएनएलची स्थिती याबाबत मनोगत व्यक्त केले. संचालन सहा. महाप्रबंधक ए. यु. जूनी, प्रास्ताविक उपमंडल अभिनेता सचिन सरोदे, तर आभार मंडल अभियंता रमेश रामटेके यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.