‘अवनी’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:01 PM2018-05-22T23:01:16+5:302018-05-22T23:01:33+5:30
येथील लेखक व दिग्दर्शक गणेश रहिकवार निर्मित ‘अवनी’ या लघुचित्रपटाला राष्ट्रीय स्तरावरील दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. औरंगाबाद येथे राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव पार पडला. तीन दिवसीय महोत्सवात देशभरातील ८० चित्रपट दाखविण्यात आले. परिक्षकांनी त्यातील काही आशयसंपन्न चित्रपटांची विविध पुरस्कारांसाठी निवड केली. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : येथील लेखक व दिग्दर्शक गणेश रहिकवार निर्मित ‘अवनी’ या लघुचित्रपटाला राष्ट्रीय स्तरावरील दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. औरंगाबाद येथे राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव पार पडला. तीन दिवसीय महोत्सवात देशभरातील ८० चित्रपट दाखविण्यात आले. परिक्षकांनी त्यातील काही आशयसंपन्न चित्रपटांची विविध पुरस्कारांसाठी निवड केली. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
‘अवनी’ या चित्रपटाला उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक रहिकवार यांनी प्रसिद्ध लेखक गोरे यांच्या हस्ते स्वीकारला. या चित्रपटाला यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. चित्रपट निर्माते रहिकवार यांनी चित्रपटात बल्लारपूर व चंद्रपुरातील कलावंतांना संधी दिली. सामाजिक आशय मांडणाऱ्या चित्रपटाला रसिकांनी पसंती दिली.
चित्रपटाचे चित्रीकरण बल्लारपूर, चंद्रपूर, बामणी, विसापूर परिसरात करण्यात आले. ‘बेटी बचाव’ हा संदेश देणाऱ्या या लघुचित्रपटात अवनी नावाच्या कर्तव्यदक्ष आणि विपरीत स्थितीत संकटांवर मात करुन पुढे जाणाऱ्या मुलीची संघर्षकथा प्रभावीपणे सादर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कलावंतानी उत्तम भूमिका करून चित्रपटातील अभियनाच्या क्षेत्रात ठसा उमटविला आहे.