चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अटकेचे आदेश; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

By राजेश भोजेकर | Published: February 23, 2023 11:53 AM2023-02-23T11:53:02+5:302023-02-23T11:54:55+5:30

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा आदेश

National Commission for Scheduled Castes and Tribes issued arrest order to Chandrapur Collector Vinay Gowda | चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अटकेचे आदेश; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अटकेचे आदेश; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

googlenewsNext

चंद्रपूर : राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोग, दिल्लीने चंद्रपूरचे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील कुसुंबी गावातील आदिवासींच्या जमिनी एका सिमेंट कंपनीने बेकायदेशीरपणे संपादित केल्याप्रकरणी राष्ट्रीय आयोगाकडे दाखल प्रकरणात हा आदेश देण्यात आला आहे.

आयोगाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना निर्देश देताना, समन्सचे पालन न केल्याबद्दल चंद्रपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले असून त्यांना आयोगासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. हा आदेश २१ फेब्रुवारी २०२३ रोजी न्यायालयीन खटला क्रमांक ३६३/२ प्रकरणी देण्यात आला. आयोगाच्या या आदेशामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Web Title: National Commission for Scheduled Castes and Tribes issued arrest order to Chandrapur Collector Vinay Gowda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.