जीएमआर एनर्जी कंपनीला राष्ट्रीय ऊर्जा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:35 PM2017-12-22T23:35:13+5:302017-12-22T23:35:51+5:30
ऊर्जा व्यवस्थापनातील संवर्धन करणे, ऊर्जा वापर आणि कार्यक्षमतेचे जतन करण्याकरिता गंभीरतेने प्रयत्न केल्यामुळे जीएमआर एनर्जी कंपनीला राष्ट्रीय ऊर्जा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
वरोरा : ऊर्जा व्यवस्थापनातील संवर्धन करणे, ऊर्जा वापर आणि कार्यक्षमतेचे जतन करण्याकरिता गंभीरतेने प्रयत्न केल्यामुळे जीएमआर एनर्जी कंपनीला राष्ट्रीय ऊर्जा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सदर पुरस्कार विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कार्यक्रमात भारताचे राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जीएमआर एनर्जीचे सीईओ एस.एन. बरडे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी ऊर्जा मंत्री अजयकुमार भल्ला, ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग, ऊर्जासचिव अभय बाके, जीएमआर वरोराचे सीईओ धनंजय देशपांडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात क्रिस्टल सिरॅमिक इंडस्ट्रीज लिमिटेड, मदर डायरी फर्ट अॅण्ड व्हिजीटेबल प्रा. लिमिटेड नवी दिल्ली, नॅशनल फर्टीलायझर्स पानीपत हरियाना, भारत ओमान रिफाईनरीज लिमिटेड, मध्यप्रदेश काबस एमएनटीपीसी लिमिटेड सुरत, गुजरात, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड जयपूर राजस्थान, टाटा मोटर्स जमशेनपूर, एंड्युस टेक्नॉलॉजी लिमिटेड औरंगाबाद आदी सहभागी झाले होते.