राष्ट्रपतींच्या हस्ते पुष्पा पोडे यांना राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल अवॉर्ड प्रदान

By साईनाथ कुचनकार | Published: June 22, 2023 05:34 PM2023-06-22T17:34:11+5:302023-06-22T17:37:32+5:30

महाराष्ट्रातून पुरस्कार मिळालेल्या एकमेव नर्सिंग अध्यापिका 

National Florence Nightingale Award presented to Pushpa Pode by the President | राष्ट्रपतींच्या हस्ते पुष्पा पोडे यांना राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल अवॉर्ड प्रदान

राष्ट्रपतींच्या हस्ते पुष्पा पोडे यांना राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल अवॉर्ड प्रदान

googlenewsNext

चंद्रपूर : जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे (पाचभाई) यांना राष्ट्रीय फ्लाॅरेन्स नाईटिंगेल अवॉर्ड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुुरुवारी राष्ट्रपती भवन येथे प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, हा पुरस्कार मिळालेल्या पुष्पा पोडे महाराष्ट्रातून एकमेव नर्सिंग अध्यापिका आहेत.

पुष्पा पोडे या मागील २००१ पासून नर्सिंग क्षेत्रांत विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम करीत आहेत. २००१ मध्ये ग्रामीण रुग्णालय अहेरी येथून आपल्या कार्याची सेवा सुरू केली. गडचिरोली जिल्ह्यासारख्या नक्षलग्रस्त भागात त्यांनी अवरित पाच वर्षे सेवा करत रुग्णसेवा केली. चंद्रपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी रुग्णसेवा केली असून, कोरोनासारख्या आपत्तीकाळात त्यांनी आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करून कोरोनाशी लढण्यासाठी तयार केले. स्वतःही कोरोनासारख्या आपत्तीकाळात त्यांनी स्वतःला अविरत झोकून देऊन, रुग्णांची सेवा करून अनेकांचे प्राण वाचवले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया यांनी फ्लॉरेन्स नाईटिंगेल अवॉर्डसाठी निवड केली. नर्सिंग क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुष्पा पोडे या शेतकरी कुटुंबातील असून त्या चंद्रपूर जिल्ह्यातील कळमना या गावातील आहेत. सध्या त्या चंद्रपूर येथे कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय वरिष्ठ सहकारी तसेच पोडे, पाचभाई अडबाले, अडवे व त्यांच्याा परिवारांना दिले असून पुढेही अविरत कार्य करण्याचा निश्चय केला आहे.

Web Title: National Florence Nightingale Award presented to Pushpa Pode by the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.