राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाअधिवेशन नागपुरात

By admin | Published: July 26, 2016 01:09 AM2016-07-26T01:09:45+5:302016-07-26T01:09:45+5:30

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने येत्या ७ आॅगस्ट रोजी नागपुरातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात एक दिवसीय ओबीसी महाधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

National General Assembly session of the OBC Federation of Nagpur | राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाअधिवेशन नागपुरात

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाअधिवेशन नागपुरात

Next

७ आॅगस्ट : निवृत्त न्या. बी.जी. कोळसे पाटील उद्घाटन करणार
चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने येत्या ७ आॅगस्ट रोजी नागपुरातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात एक दिवसीय ओबीसी महाधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन सकाळी १० वाजता निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे राहणार असून अध्यक्षस्थानी प्रा. या. वा. वडस्कर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, नागपूरचे पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री व विधानसभेचे काँग्रेस उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, खा. रामदास तडस, खा. नाना पटोले, खा. राजीव सातव, आ. सुनील केदार, आ. रवी राणा, माजी आमदार पांडुरंग ढोले व सेवक वाघाये उपस्थित राहतील.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आॅल इंडिया फेडरेशन आॅफ एम्प्लाईज असोसिएशनचे (चेन्नई) महासचिव जी. करुणानिधी राहणार असून राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री ना. महादेवराव जानकर, आ. जितेंद्र आव्हाड, आ. बच्चू कडू, आ. विजयराव रहागंडाले, आ. बाळू धानोरकर, बबनराव फंड, एस.एल. आक्कीसागर, जयंत लुटे, प्रा. रमेश पिसे, परिणय फुके उपस्थित राहतील. यावेळी बहुजन-ओबीसी चळवळीत आपले योगदान देणारे बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी, माजी मंत्री सुधाकरराव गणगणे, प्रा. मा. म. देशमुख व बबनराव फंड यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सकाळी ११.३० वाजता ओबीसी शिष्यवृत्ती व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर व यशदाचे राष्ट्रीय प्रशिक्षक अ‍ॅड. गणेश हलकारे हे प्रमुख वक्ते असून प्रा. जैमिनी कडू अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. आर.जी. टाले, महात्मा फुले समता परिषदेचे विदर्भ संघटक प्रा. दिवाकर गमे, सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष प्रा. अशोक चोपडे, प्रा. अरुण पवार, दिनेश चोखारे, नितीन मते, रविकांत बोपचे, सलील देशमुख, डॉ. राजेश ठाकरे, भूषण दडवे आदी उपस्थित राहणार आहेत.
दुपारी २.३० वाजता आयोजित ओबीसी शेतकऱ्यांची समस्या व उपाय या विषयावरील दुसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे, कृषितज्ज्ञ अमिताभ पावडे मार्गदर्शन करतील. गोंदिया ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे हे अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी अरुण पाटील मुनघाटे, रमेश मडावी, बबनराव नाखले, अविनाश काकडे, प्रा. देवानंद कामडी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार.सायंकाळी ४.३० वाजेच्या तृतीय सत्रामध्ये ओबीसी महिला व सामाजिक परिवर्तन या विषयावर बीडच्या सुशीलाताई मोराळे व नागपूरच्या नंदाताई फुकट मार्गदर्शन करतील. तर अध्यक्षस्थानी प्रा. नूतन माळवी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य विद्या तट्टे, शुभांगी घाटोळे, यामिनी चौधरी, अ‍ॅड. रेखा बारहाते उपस्थित राहतील. सायंकाळी ५.३० वाजता समारोपीय कार्यक्रमाचे वक्ते म्हणून बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी व राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे संयोजक नितीन चौधरी मार्गदर्शन करतील. (प्रतिनिधी)

Web Title: National General Assembly session of the OBC Federation of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.