शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावर ई-पोस्टर स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:19 AM2021-07-11T04:19:46+5:302021-07-11T04:19:46+5:30
या स्पर्धेकरिता देशभरातून ९२ विद्यार्थ्यांनी पोस्टर्स पाठविले होते. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. ई-पोस्टर मेकिंग स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य ...
या स्पर्धेकरिता देशभरातून ९२ विद्यार्थ्यांनी पोस्टर्स पाठविले होते. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. ई-पोस्टर मेकिंग स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य एस. बोरकर, अतुल कामडी, डॉ. विजय रुद्रकार यांनी केले.
प्रथम पारितोषिक पाच हजार रोख राहुल हुल्के, एस. पी. कॉलेज, चंद्रपूर याला मिळाले. द्वितीय पारितोषिक चार हजार रोख दीपा कुमारी चौरसिया, झेड. ए. इस्लामिया पीजी कॉलेज सिवान, जय प्रकाश विद्यापीठ छपरा, बिहार हिला मिळाले, तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये रोख कसक नौटियाल, श्री देव सुमन पदवी महाविद्यालय चिन्याली सौर, उत्तराखंड हिने पटकावले, तर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी एक हजार रु.रोख हिमांशी पाठक, जी.पी.जी.सी. बेरीनाग पिथौरागड, एस.एस.जे. विद्यापीठ अल्मोडा, उत्तराखंड आणि एस. पी. कॉलेज, चंद्रपूरची वैष्णवी हळकरे यांना देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, उपप्राचार्य डॉ. आर. खेरानी यांनी मोलाचे योगदान दिले.