लोक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:53 AM2021-03-04T04:53:22+5:302021-03-04T04:53:22+5:30
तळोधी(बा) : दि रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरीद्वारा संचालित लोक विद्यालय तळोधी(बा) येथे कोविड १९ च्या नियमांचे पालन करून ...
तळोधी(बा) : दि रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरीद्वारा संचालित लोक विद्यालय तळोधी(बा) येथे कोविड १९ च्या नियमांचे पालन करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
प्रास्ताविकात विज्ञान शिक्षक संतोष नन्नावार यांनी मार्गदर्शनात सांगितले की सी.व्ही.रमण हे आधुनिक भारतातील एक महान वैज्ञानिक होते. विज्ञान क्षेत्रात त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि आपल्या विविध संशोधनांमुळे विज्ञानाच्या दुनियेत आपल्या भारताला वेगळी ओळख मिळवून दिली. ‘रमण प्रभाव’ हा त्यांचा संशोधनांपैकी एक महत्त्वपूर्ण शोध होता. त्याकरिता त्यांना १९३० साली नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी हा शोध लावला नसता तर समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का असतो हे आपल्याला कधी समजलेच नसते. त्यांनी केलेल्या नवनवीन शोधामुळे विज्ञान क्षेत्रात भारताला एक नवी दिशा मिळाली. यावेळी आर. बी. विधाते, ज्येष्ठ शिक्षक ए. वाय. बांगरे, पी.यु.गिरडकर, एम.व्ही.टोंगे, ए. एन. कोहळे, आर.डी. हांडेकर, आर.एम.निनावे, डी.आर.रेहपाडे, पी.बी.पाकमोडे, एस.व्ही. बालमवार, ज्योती मोहूर्ले, संजय शेंडे, सुरेश कुंभरे उपस्थित होते.
संचालन विद्यालयातील विद्यार्थिनी चांदणी दिनकर गायकवाड व आभार तरन्नुम शेख व हर्षाली पाकमोडे हिने मानले.