न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:53 AM2021-03-04T04:53:41+5:302021-03-04T04:53:41+5:30
चंद्रपूर : दि एज्युकेशन सोसायटी चंद्रपूरद्वारा संचालित स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे थोर शास्त्रज्ञ, नोबेल ...
चंद्रपूर : दि एज्युकेशन सोसायटी चंद्रपूरद्वारा संचालित स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे थोर शास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते डाॅ. सी.व्ही. रमण यांच्या रमण इफेक्ट या शोधनिबंधाबद्दल मिळालेल्या नोबेल पारितोषिकाच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य हरिहर भांडवलकर, प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान विषय प्रमुख तथा पर्यवेक्षिका संगीता बैद आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मिडलस्कूल विभागातून प्रथम क्रमांक दिव्या बाकडे, द्वितीय क्रमांक झेबा शेख, तृतीय क्रमांक पीयूष गोपलानी यांनी पटकाविले. तर आदर्श उरकुडे वर्ग ५ वा या विद्यार्थ्याच्या निबंधाला उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
हायस्कूल विभाग इयत्ता १० वीमधून सुहानी वासेकर, श्रेया रामटेके, सोनाली यादव या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर इयत्ता नववीमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करण्याचा बहुमान अनुक्रमे निशा चहांदे, लिशा मोहुर्ले, वेदांत विधाते या विद्यार्थ्यांनी मिळविला. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवर व शिक्षकांच्या हस्ते पारितोषिके देऊन यथोचित गौरव करण्यात आला. प्रास्ताविक अर्चना रामटेके यांनी डाॅ. सी.व्ही. रमण यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी मोलाची माहिती दिली. आभार कुमुद घोटेकर यांनी मानले.
कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक मत्ते, पत्तीवार तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.