श्री महर्षी विद्यामंदिरमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:51 AM2021-03-04T04:51:51+5:302021-03-04T04:51:51+5:30
चंद्रपूर : श्री महर्षी विद्यामंदिर येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी पोस्टर मेकिंग स्पर्धा, भाषण स्पर्धा, वादविवाद ...
चंद्रपूर : श्री महर्षी विद्यामंदिर येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी पोस्टर मेकिंग स्पर्धा, भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, मॉडेल बनविणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धांचे परीक्षण विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका नीशा मेहता यांनी केले. सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या पोस्टर स्पर्धेत सावरी नगराळे, अवनी गुरनुले, स्वर्णिम वाक्कर यांनी पटकावला. आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या वाद-विवाद स्पर्धेत आर्या आइंचवार, आसावरी मोहुर्ले, जयश्री चोखारे, भाषण स्पर्धेत अद्वैत पाडेवार, उद्धव नल्लुरी, ज्ञानदीप अडवे, चक्रधर अंकम, खुशांत बनकर, पोस्टर मेकिंग स्पर्धेत मुग्धा आणि धनश्री, द्वितीय तन्वी आणि विजेंद्र यांनी पटकावला. मॉडेल तयार करण्यात प्रयम कुबेर रेभनकर व चमू, द्वितीय चैतन्य आणि चमू, तृतीय श्रेयश अमृतकर व चमू यांनी पटकावला. यावेळी गुरुकुल शिक्षा संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक, सचिव दत्तात्रय कंचर्लावार, सदस्य वीरेंद्र जयस्वाल, मुख्याध्यापिका श्रीलक्ष्मी मूर्ती आदींनी मार्गदर्शन केले. विज्ञान शिक्षिका सुल्ताना खान, निखत खान, प्राची बेरशेट्टीवार, मीनाक्षी शास्त्रकार यांनी सहकार्य केले.