राष्टÑीय मुस्लीम मोर्चाचे अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:48 PM2017-10-10T23:48:20+5:302017-10-10T23:48:35+5:30

राष्टÑीय मुस्लीम मोर्चा आणि मायनॉरिटी ग्रुपच्या वतीने बॅरि. खोब्रागडे सभागृहात मुस्लीम समाज उत्साहात पार पडले. या संमेलनात सामाजिक न्याय व बंधुतेवर विचारमंथन करण्यात आले.

National Seminar on the Muslim Brotherhood | राष्टÑीय मुस्लीम मोर्चाचे अधिवेशन

राष्टÑीय मुस्लीम मोर्चाचे अधिवेशन

Next
ठळक मुद्देजनजागृती : सामाजिक न्याय व बंधुतेवर विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: राष्टÑीय मुस्लीम मोर्चा आणि मायनॉरिटी ग्रुपच्या वतीने बॅरि. खोब्रागडे सभागृहात मुस्लीम समाज उत्साहात पार पडले. या संमेलनात सामाजिक न्याय व बंधुतेवर विचारमंथन करण्यात आले. अध्यस्थानी प्रसिद्ध विचारवंत विलास खरात तर उद्घाटक म्हणून जाबीर रजा उपस्थित होते.
मौलाना जाबीर रजा म्हणाले, देशाशी प्रेम करणे हे एक इबादत आहे. जातपात भेदभावला आपण बळी पडू नये. सामाजिक न्यायाचा विचार प्रत्येकाने आत्मसात करावा. फादर सुनीलकुमार फ्रॉसिंस यांनी देशातील परिस्थितीवर भाष्य केले. अनवर भाई यांनी सर्व समाजबांधवांना एक होण्याची विनंती केली. शाहीन खान शफी खान यांनी आजची परिस्थिती विशद केली. लिंगायत समाजचे प्रतिनिधी म्हणून एकता श्रीकांत पिट्टूलवार यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली. हे बंधूभावाचे संगठन असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्वांनी आपसी एकता कायम केली पाहिजे, असे ही सांगितले. बौद्ध महासभाचे प्रा. कोसे म्हणाले, भारतीय संविधानाच्या माध्यमातून विकास होऊ शकतो. त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. सिख समुदायातील राजेंद्रसिंग सलुजा संमेलनाची उपयोगीता सांगितली. बंधूभाव व्यक्त केला. सुलतान फाऊंडेशनचे अमजदजी यांनी टीपू सुलतानच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास खरात म्हणाले, अल्पसंख्याकाचेो प्रश्न वाढत आहे. आम्हाला पुन्हा आमचे मौलिक अधिकार परत मिळविण्याशिवाय पर्याय नाही. मुस्लिम समाजाने संवैधानिक अधिकार समजले पाहिजे. निष्पाप मुसलमान युवकांना आंतकवादी घोषित करुन २०-२५ वर्षे तुरुंगात डांबण्यात येत आहे. पुरावे नसताना समाजाचे मनोबल खच्चीकरण करण्याचे षडयंत्र आखल्या जात आहे. या घटनांचा सामूहिक पातळीवर विरोध केला पाहिजे. डॉ. कोचे, डॉ. राकेश गावतुरे यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक राष्टÑीय मुस्लिम मोर्चाचे डॉ. सिराजखान, संचालन राजू ढेंगळे यांनी केले. आभार डॉ. आशिष यांनी मानले. यशस्वीकरण्यासाठी शाहीदा शेख, विवेक हेडाऊ, सुभाष खोब्रागडे, फरजाना शेख, रुबिना शेख अफसर बाजी, करुणा चालखुरे, सोनटक्के, एक्राम शेख सुफिया शेख, जुलमे आणि विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी सहकार्य केले.

Web Title: National Seminar on the Muslim Brotherhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.