नीळकंठराव शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:32 AM2021-09-24T04:32:48+5:302021-09-24T04:32:48+5:30
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसन वीर महाविद्यालय ...
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसन वीर महाविद्यालय वाई, सातारा येथील संचालक तथा एनसीसीचे सहयोगी अधिकारी समीर पवार हे होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे संघटन सचिव प्रा.डॉ. विशाल शिंदे, संयोजक प्रा.डॉ. शशिकांत खित्रे, प्राचार्य डॉ. लेमराज लडके, प्रा.डॉ. कार्तिक शिंदे उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. पवार यांनी डिफेन्स सर्व्हिसेसविषयी विस्तृत माहिती देत विविध डिफेन्स सर्व्हिसेससाठी कोणकोणती प्रवेश पात्रता असायला पाहिजेत आणि इंडियन आर्मी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्मी कंपनी असल्याची विस्तृत माहिती दिली. त्याचप्रमाणे डॉ. विवेक शिंदे यांनी अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील विविध संघटनांना लाभ होईल, असा आशावाद व्यक्त केला.