जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे मौनव्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:36 PM2018-10-03T22:36:43+5:302018-10-03T22:37:39+5:30

केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी जिल्हाभरात मौनव्रत व धरणे आंदोलन करण्यात आले.

Nationalist Congress Party | जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे मौनव्रत

जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे मौनव्रत

Next
ठळक मुद्देकेंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध : चंद्रपूर, राजुरा, भद्रावती, सावली येथे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी जिल्हाभरात मौनव्रत व धरणे आंदोलन करण्यात आले.
चंद्रपूर शहर राष्ट्रवादी वतीने महानगरपालिका समोरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ मौनव्रत आंदोलन करून सरकारविरूद्ध टीका केली. जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, राजेंद्र वैद्य, नगरसेवक दीपक जयस्वाल, सुनील काळे, नितीन भटारकर, बेबी उईके, ज्योती रंगारी, दीपक गोरडवार, महेंद्र लोखंडे, नौशाद सिद्दीकी, निलेश उपरे, अब्दुल जमील शेख, रवी नाचपेलवार, किसन झाडे, हर्षल पिपरे, देवा कनकम, मंगला आकरे, वंदना आवडे, निर्मला नववाडे, राजेंद्र आकरे, साधना देवगडे, श्वेता रामटेके, शोभा गरडे, शर्मिला विश्वास, मोहम्मद जहीर, सुजित उपरे तसेच अन्यनागरिक उपस्थित होते.
भद्रावती येथील राकाँ शाखेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मुनाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. युवराज धानोरकर, तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर, शहर अध्यक्ष सुनील महाले, अजय रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष सबिया देवगडे, शहर अध्यक्ष सुषमा राऊत, तालुका अध्यक्ष दुर्गा बिश्वास आदी उपस्थित होते. महात्मा गांधींनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व हे भाजपाच्या प्रतिगामी धोरणांमुळे धोक्यात आले. दरम्यान, तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करत मौनव्रत धरणे आंदोलन केले. पेट्रोल, डिझेल, गॅस, राफेल घोटाळा, विचारवंतांच्या हत्येचा रखडलेला तपास, शेतकरी आत्महत्या, शिक्षक भरती आदी प्रश्नांबाबत सरकारने जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करून महात्मा गांधी पुतळ्यासमोर सकाळी १०.३० वाजता मौनव्रत धारण केले.
सावली येथे राकाँचे ब्रह्मपुरी विधानसभा अध्यक्ष प्रशांत गाडेवार, तालुकाध्यक्ष अनिल स्वामी, गटनेते नगरसेवक गुणवंत सुरमवार यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी युवक तालुकाध्यक्ष ईश्वर बटे, माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ वाढई, किसान सेलचे तालुकाध्यक्ष खुशाल राऊत, नगरसेवक राकेश तातकोंडावार, विजय सातरे, कुसुम रसे, उत्तम गेडाम, राजू व्यास, मनोज धर्मापवार, आकाश बुरीवार, संजय धोटेकर, वामन भोपये, पंकज सुरमवार, हिम्मत आभारे, भास्कर उरकुडे, मोरेश्वर पोटे, प्रमोद गेडाम, आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. गाडेवार, स्वामी यांनी भाजपा सरकारच्या जनविरोधी धोरणांचा समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या हितासाठी या सरकारने आतापर्यंत काहीही केले नाही. धार्मिक वाद निर्माण करून खºया प्रश्नांना बगल देत आहे, असे मत उपस्थितांनी मांडले.
राजुरा येथे सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत जुन्या बसस्थानक परिसरात पार पडलेल्या धरणे आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार व राकाँचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन निमकर यांनी केले. सकाळी १० वाजतापासून मौनव्रत धारण करुन सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्हा राष्टÑवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष मेहमूद मुसा, तालुकाध्यक्ष हरिदास झाडे, तालुका महिला अध्यक्ष चंद्रकला रणदिवे, शहर अध्यक्ष विजय येवले, शहर युवक अध्यक्ष नितीन बाबटकर, लता ठाकरे, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष सुरेश पावडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा
गडचांदूर : शेतकरी, शेतमजूर, महिला बचतगट कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका, मदतनिस व आशा वर्कर यांच्या विविध समस्यांवर विचारमंथन करून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कोरपना तालुका व गडचांदूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवारी लक्ष्मी टाकीज सभागृहात मेळावा घेण्यात आला. मार्गदर्शक म्हणून राकाँच्या प्रवक्त्या चित्रा वाघ, अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदर्शन निमकर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, जिल्हा महिला अध्यक्ष बेबी उईके, जिल्हा युवक अध्यक्ष नितीन भटारकर, राजुरा विधानसभा अध्यक्ष निले ताजणे, नगराध्यक्ष विजया अरुण डोहे, तालुका अध्यक्ष अरूण डोहे, शहर अध्यक्ष शरद जोगी, अमोल आसेकर आदी उपस्थितीत होते. चित्रा वाघ म्हणाल्या, राज्यातील भाजपा सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत. शेतकºयांच्या हितासाठी सरकारकडे धोरणच नाही. परिणामी, आत्महत्या वाढत आहेत. बेरोजगारांमध्ये निराशा निर्माण झाली. शेतमजुरांचीही रोजगाराअभावी दैना झाल्याचे त्यांनी नमूद केले.

वरोरा : महात्मा गांधी पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने मूक आंदोलन करून सरकारच्या अन्यायकारक धोरणांचा निषेध केला. वरोरा-भद्रावती विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी माजी नगराध्यक्ष पिंपळशेंडे, महिला तालुका अध्यक्ष मनीषा काकडे, शहर अध्यक्ष सुजिता नरडे, लता हिवरकर, बालाजी कोल्हेकर, प्रल्हाद मोहारे, बंडू खारकर, अशोक देवगडे, गोलु चौधरी, किशोर दारव्हनकर, विजय खिरटकर, अरुण सहारे, शहर मडावी, जिवतोडे, दिलीप खैरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.