सिंदेवाहीतील दररोजच्या भाजी बाजाराला आठवडी बाजाराचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:31 AM2021-08-19T04:31:09+5:302021-08-19T04:31:09+5:30

सिंदेवाही : नगर पंचायतअंतर्गत जुना बसस्थानक येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दररोज भरणाऱ्या भाजी बाजाराला आठवडी बाजारासारखे व्यापक स्वरूप येत ...

The nature of the weekly market to the daily vegetable market in Sindevahi | सिंदेवाहीतील दररोजच्या भाजी बाजाराला आठवडी बाजाराचे स्वरूप

सिंदेवाहीतील दररोजच्या भाजी बाजाराला आठवडी बाजाराचे स्वरूप

Next

सिंदेवाही : नगर पंचायतअंतर्गत जुना बसस्थानक येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दररोज भरणाऱ्या भाजी बाजाराला आठवडी बाजारासारखे व्यापक स्वरूप येत आहे. सोमवारी भरणारा आठवडी बाजार आता दररोज भरतो का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

एप्रिलपासून कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाने सर्व ठिकाणचे आठवडी बाजार बंद करण्यात आले होते. कोरोनाचे रुग्ण कमी होताच काही निर्बंध शिथिल केले. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना वेळेचे आणि नियमांचे पालन करून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार सिंदेवाही येथेदेखील भाजी बाजार सामाजिक अंतराचे पालन करून सुरू भरविण्यात आला. ही गुजरी नागपूर-चंद्रपूर या राज्य मार्ग क्र. ९ वर जुना बसस्थानक परिसरात भरविण्यात येत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाल्याने काही ठिकाणी आठवडी बाजार सुरू झाले. मात्र, कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडविले गेले. याला सिंदेवाही शहरदेखील अपवाद नाही. बरेच लोक विनामास्क घराबाहेर भाजी बाजारात येत आहे. प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. सुरुवातीला भरणाऱ्या भाजी बाजाराला व्यापक स्वरूप येत आहे. दर सोमवारी तो वाढतच आहे. जागेच्या कमतरतेमुळे बरेच हातगाडीवाले रस्त्यावर आपली दुकाने लावत असतात. यामुळे वाहतुकीला अडथडा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची भीती नाकारता येत नाही. भाजी बाजारातील गर्दी पाहून ही गुजरी आहे की आठवडी बाजार, असा प्रश्न पडत आहे. प्रशासनाने आता आठवडी बाजार भरविण्याला परवानगी देऊन रस्त्यावर भरणारा भाजी बाजार जुन्या आठवडी बाजाराच्या जागेवर स्थलांतरित करून रस्ता मोकळा करावा, अशी येथील जनतेची मागणी आहे.

Web Title: The nature of the weekly market to the daily vegetable market in Sindevahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.