हजारो हेक्टर शेतीवर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 10:02 PM2018-10-07T22:02:51+5:302018-10-07T22:03:35+5:30

शेतीला निसर्गाची साथ मिळत नसल्याने खरिपातील हजारो हेक्टर शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा पसरली आहे. पावसाअभावी पिके करपायला लागली असून शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.

Nature's Wisdom on Thousand Hectare Farm | हजारो हेक्टर शेतीवर निसर्गाची वक्रदृष्टी

हजारो हेक्टर शेतीवर निसर्गाची वक्रदृष्टी

Next
ठळक मुद्देपावसाअभावी पिके करपली : पाऊस झाला बेपत्ता

प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : शेतीला निसर्गाची साथ मिळत नसल्याने खरिपातील हजारो हेक्टर शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा पसरली आहे. पावसाअभावी पिके करपायला लागली असून शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवतीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. पावसमाुळे उत्पादनात वाढ होईल, असे वाटत असतानाच ऐन वेळी पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली आहे. सध्या पिकांच्या फळधारणेचा काळ आहे. परंतु गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने पिकांना मोठा फटका बसला असून कापसाचे पीक करपायला लागले आहे. विदर्भ प्रांत कापूस पिकांसाठी प्रसिद्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. यावर्षी उसनवारी व कर्ज काढून बहुतांश शेतकºयांनी शेती केली आहे. परंतु निसर्गाने ऐनवेळी खरिपाच्या पिकांना दगा दिला आहे. कपासीवर यावर्षी बोंडअळीचे सावट घोंगावत असताना अचानक पावसाने पाठ फिरविल्याने फळधारणेवर आलेली पिके करपायला लागली आहे. यावर्षी कपाशीला विविध रोगांनी ग्रासल्याने शेतकºयांनी पिकावर अतोनात खर्च केला आहे. मात्र परतीचा पाऊसही अचानक बेपत्ता झाल्याने खरिपातील पिकांचे आता कसे होणार, या विवंचनेत शेतकरी सापडले आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. जमिनीतील ओलावा आटून गेल्याने जमिनीला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. आज उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. परंतु पाऊस येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. पाऊस आला नाही तर यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. एकूणच शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे.
एका बॅगला तीन पोते सोयाबीनची उतारी
सोयाबीनचा दाना भरण्यासाठी पावसाची गरज आहे. मात्र पाऊस आला नाही. त्यामुळे सोयाबीनचा दाना भरला नाही. पोकळ शेंगा लागल्या. शेतकºयांनी सोयाबीनवर खर्च केला. आता सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असून एका बॅगला तीन पोते सोयाबीन उतारी मिळत असल्याने केलेला खर्च निघणार कसा, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

पावसाअभावी शेतातील पिके वाळायला लागली आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट होणर असून शेतीवर केलेला खर्च भरुन निघेल की नाही, याची हमी शेतकऱ्यांजवळ नसल्याने शेतकरी आताच हतबल झाला आहे.
-गणेश पाटील, शेतकरी भोयेगाव

Web Title: Nature's Wisdom on Thousand Hectare Farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.