‘१०८’ रुग्णांसाठी नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:43 PM2018-10-14T22:43:56+5:302018-10-14T22:44:33+5:30

रुग्णांना तत्काळ रुग्णालयात नेण्याच्या उद्देशाने शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णावाहिका सुरु केली. या रुग्णवाहिकेने मागील चार वर्षांत ९५ हजार ६२४ रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहचवून जीवदान दिले आहे.

Navajnivani for '108' patients | ‘१०८’ रुग्णांसाठी नवसंजीवनी

‘१०८’ रुग्णांसाठी नवसंजीवनी

Next
ठळक मुद्देग्रामीण रुग्णांना दिलासा : विविध आजाराच्या ९५ हजार रुग्णांना दिले जीवनदान

परिमल डोहणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रुग्णांना तत्काळ रुग्णालयात नेण्याच्या उद्देशाने शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णावाहिका सुरु केली. या रुग्णवाहिकेने मागील चार वर्षांत ९५ हजार ६२४ रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहचवून जीवदान दिले आहे.
रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावे, या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय आरोय अभियानांतर्गत १०८ क्रमांकाची रुग्णावाहिका नागरिकांच्या सेवेत आणली. ग्रामीण भागात आजही दळणवळणाच्या सोई उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना त्वरित जिल्हा रुग्णालयात किंवा शहरातील रुग्णालयात नेण्यासाठी अडचण जाते. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु केली आहे. मागील चार वर्र्षींच्या आकडेवारी लक्षात घेतल्यास ही रुग्णवाहिका रुग्णांना नवसंजीवनी देत असल्याचे सिद्ध होत आहे. सन २०१४ पासून या रुग्णवाहिकेने ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत ९५ हजार ६२४ रुग्णांना जीवदान दिले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सर्व सोईसुविधा उपलब्ध असलेल्या २३ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. या रुग्णवाहिकेमध्ये विभागीय व्यवस्थापक डॉ. घाटे यांच्या नेतृत्वात जिल्हा व्यवस्थापक डॉ. चेतन कोरडे यांच्या नेतृत्वात रुग्णवाहिकेवर ५२ चालक, ४१ डॉक्टर सेवा देत आहेत. दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांनी फोन करुन माहिती दिल्यास सदर रुग्णवाहिका त्वरित त्या घटनास्थळावर जाऊन त्याला रुग्णालयात हजर करते. तसेच रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध असल्यास ते रुग्णांवर प्राथमिक उपचार करीत असल्याने रुग्णालयात जातपर्यंत रुग्ण दगावण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे.

रुग्णाच्या कुटुंबीयांकडून फोन आल्यानंतर उपलब्ध असलेली रुग्णवाहिका त्वरित त्याठिकाणी पाठविली जाते. तसेच रुग्णवाहिकेतील डॉक्टरही त्या रुग्णावर उपचार करीत असतात. त्यामुळे रुग्णाला सुरळीत रुग्णालयात पोहचविण्यात यश येत आहे. आमच्याकडील सर्व रुग्णवाहिका सर्व सुविधायुक्त व सुस्थितीत असून रुग्णांना सेवा देण्यासाठी तत्पर आहेत.
-डॉ.चेतन कोरडे, जिल्हा व्यवस्थापक

Web Title: Navajnivani for '108' patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.