नवरगाव-सिंदेवाही मार्ग देतोय अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:10 PM2018-07-15T23:10:26+5:302018-07-15T23:10:51+5:30
नवरगाव-सिंदेवाही मार्गाचे रुंदीकरण करुन डागडुजी करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच या रस्त्याच्या बाजूला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने समोरासमोर वाहने आल्यास वाहन काढताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवरगाव : नवरगाव-सिंदेवाही मार्गाचे रुंदीकरण करुन डागडुजी करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच या रस्त्याच्या बाजूला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने समोरासमोर वाहने आल्यास वाहन काढताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
सदर मार्ग सिंदेवाही नवरगाव- चिमूर व वरोरा जोडणारा आहे. नवरगाव-सिंदेवाही मार्ग अरूंद असल्याने एकेरी वाहतूक सुरू असते. मात्र समोरून दुसरे चारचाकी वाहन आल्यास दोन्ही वाहनांचे एक चाक रोडच्या खाली उतरवावे लागते. रोडच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात उतार आहे. त्यामुळे याठिकाणी मुरूम टाकणे गरजेचे असताना माती टाकण्यात आली आहे. परिणामी मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे त्याठिकाणी मोठे खड्डे पडले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.तसेच नवरगाव अंतरगाव मार्गाचीसुद्धा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे दोन चारचाकी वाहन आल्यास इतर चालकांना आपले वाहन रस्त्याच्या कडेवर उतरवावे लागते. मात्र रस्त्याची चढाई जात असल्याने वाहन उतरविण्यास अडचण जात आहे. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे संंबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
अनेकांनी गमावले प्राण
नवरगांव-सिंदेवाही मार्गावर आजपर्यंत आठ ते दहा अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांचा जीव गेला तर अनेकांना कायमचे अंपगत्व आले आहे. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी रस्त्याची डागडूजी करुन रुंदीकरण करण्याची मागणी आहे.