गोंडकालिन विहिरींना नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:27 AM2017-12-29T01:27:20+5:302017-12-29T01:27:31+5:30

‘प्राचीन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण’ या शिर्षकाखाली लोकमतने वृत्त प्रकाशित करून गोंडकालिन विहिरींच्या दूरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत महापौर आणि आयुक्तांनी विहिरींची पाहणी करीत त्यांना नवसंजीवनी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Navsanjivani to Gondalin wells | गोंडकालिन विहिरींना नवसंजीवनी

गोंडकालिन विहिरींना नवसंजीवनी

Next
ठळक मुद्देपाणी पिण्यायोग्य करणार : महापौर, आयुक्तांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘प्राचीन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण’ या शिर्षकाखाली लोकमतने वृत्त प्रकाशित करून गोंडकालिन विहिरींच्या दूरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत महापौर आणि आयुक्तांनी विहिरींची पाहणी करीत त्यांना नवसंजीवनी देण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी सध्या एकमेव इरई धरण हेच जलस्रोत उपलब्ध आहे. यावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे चंद्रपूरला पाणी पुरवठा करणारे या इरई धरणात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. परिणामी चंद्रपुरावर पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. असे असतानाही शहरात असलेल्या प्राचीन जलस्रोतांकडे दुर्लक्ष केले जात आहे. गोंडराजाच्या राजवटीत चंद्रपुरात अनेक मोठमोठ्या विहिरी बांधल्या आहेत. ब्रिटीश सरकारनेही काही विहिरी बांधल्या. त्या आजही आपल्या पोटात बाराही महिने पाणी साठवून अस्तित्वात आहेत. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या विहिरी घाणीने बरबटल्या आहेत. तब्बल १५ ते १७ एमएलडी पाणी या विहिरींमधून चंद्रपूरकरांना मिळू शकते. चंद्रपुरातील या गोंडकालिन विहिरींच्या दूरवस्थेची कहाणी सांगणारे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. या वृत्ताची मनपा प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. महापौर अंजली घोटेकर आणि आयुक्त संजय काकडे यांनी शहरातील या विहिरींची पाहणी केली.

Web Title: Navsanjivani to Gondalin wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.