चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीएचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:06 PM2018-10-22T23:06:43+5:302018-10-22T23:06:59+5:30

केंद्र शासनाच्या धोरणानुसार एनबीए या संस्थेने केलेल्या तपासणीत चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र व विद्युत अभियांत्रिकी या दोन विभागाला एनबीएचा विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. सदर दर्जा प्राप्त करणारे हे गोंडवाना विद्यापीठातील पहिले महाविद्याल ठरले आहे, या दर्जामुळे कामाला गती मिळणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जी. जी. भुतडा यांनी सोमवारी चंद्रपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत दिली.

NBA status to Chandrapur Government Engineering College | चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीएचा दर्जा

चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीएचा दर्जा

Next
ठळक मुद्देजी. जी. भुतडा यांची माहिती : गोंडवाना विद्यापीठातील पहिले महाविद्यालय

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र शासनाच्या धोरणानुसार एनबीए या संस्थेने केलेल्या तपासणीत चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र व विद्युत अभियांत्रिकी या दोन विभागाला एनबीएचा विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. सदर दर्जा प्राप्त करणारे हे गोंडवाना विद्यापीठातील पहिले महाविद्याल ठरले आहे, या दर्जामुळे कामाला गती मिळणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जी. जी. भुतडा यांनी सोमवारी चंद्रपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयाकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाची मानके ठरविण्यात आली आहे. या मानकांचे जी महाविद्यालये पालन करतात. अशा संस्थांची तपासणी व मुल्यांकन ठरविण्याची जबाबदारी राष्ट्रीय स्तरावर एनबीए संस्थेकडे आहे. या संस्थेद्वारे नॅकप्रमाणे एकंदरीत महाविद्यालया, दर्जा न देता संस्थेतील जे विभाग मानकांचे पालन करतात त्याच विभागांना हा दर्जा दिला जातो.
एनबीए संस्थेकडून २० ते २२ जुलै रोजी चंद्रपुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विभागांची तपासणी करण्यात आली. त्यामधील यंत्र व विद्युत अभियांत्रिकी या दोन विभागाला एनबीएतर्फे विशेष मान्यता देण्यात आली. तर एका विभागाला केवळ तीन टक्के गुण कमी पडले आहेत. त्यासाठी संस्थेने पुन:मुल्यांकनासाठी अर्ज केला आहे. संस्थेला दर्जा प्राप्तीसाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतल्याची माहिती यावेळी प्राचार्य डॉ. जी. जी. भुतडा यांनी दिली. यावेळी प्रा. नेहे, प्रा. राजुरकर, प्रा. ढोमणे, प्रा. कुलकणी, प्रा. बेडेकर उपस्थित होते.

Web Title: NBA status to Chandrapur Government Engineering College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.