ब्रह्मपुरी येथे एनसीसीचे पाचदिवसीय प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:31 AM2021-03-01T04:31:10+5:302021-03-01T04:31:10+5:30
या शिबिरामध्ये ने. हि. महाविद्यालयाचे ६८ कॅडेट्स सहभागी झाले होते. २० महाराष्ट्र बटालियन एनसीसी नागपूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमोद ...
या शिबिरामध्ये ने. हि. महाविद्यालयाचे ६८ कॅडेट्स सहभागी झाले होते. २० महाराष्ट्र बटालियन एनसीसी नागपूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमोद चांदना व एडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल संजय कदम यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण शिबीर पार पाडले. शिबिरात हत्यार प्रशिक्षण, नकाशा वाचन व आरोग्य विषयाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. याव्यतिरिक्त बी प्रमाणपत्र आणि सी प्रमाणपत्र परीक्षेची तयारी कॅडेट्सकडून करून घेण्यात आली. दरम्यान, कॅडेट्सकरिता एसएसबी आणि सीडीएस परीक्षासंबंधी कार्यशाळेत प्रसन्ना चौधरी व कर्नल अविनाश मुळे यांचे मार्गदर्शन लाभले. गर्ल कॅडेट्ससाठी हेल्थ आणि हायजीन, ब्रेस्ट कॅन्सर जागृती आणि कोविड या विषयावर डॉ. पल्लवी शेंडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच ड्रील स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धेचेसुद्धा आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. अभिजित परकरवार, जेसीओ जसपाल सिंग, हवालदार कुलविंदर सिंग आणि एनसीसी निर्देशक प्रा. मिथुन चौधरी यांनी सहकार्य केले. ने. हि. शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, उपप्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे व मेजर प्रा. विनोद नरड यांचे मार्गदर्शन लाभले.