जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:00 AM2020-09-19T05:00:00+5:302020-09-19T05:00:24+5:30

महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेत आहेत. कांद्याला चांगला भाव मिळायला लागला होता. मात्र भाजप सरकारने बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्यात बंदी घातली आहे. त्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे काद्यांची निर्यात सुरु करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

NCP agitation in front of Collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

Next
ठळक मुद्देकांदा निर्यात बंदी हटवावी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कांद्याची निर्यात बंदी केल्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी रकरण्यात आली.
महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेत आहेत. कांद्याला चांगला भाव मिळायला लागला होता. मात्र भाजप सरकारने बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्यात बंदी घातली आहे. त्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे काद्यांची निर्यात सुरु करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवळे, ओबीसी अध्यक्ष शुभांगी डोंगरवार, जिल्हा संघटिका ज्योती कवठेकर जिल्हा सचिव शोभा घरडे, राणी रॉय, रंजना नागतोडे, निलिमा नरवडे, माधुरी पांडे, सुमित्रा वैद्य, नंदा सोनुले, श्वेता रामटेके आदी उपस्थित होते.

Web Title: NCP agitation in front of Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.