रासायनिक खते व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची चंद्रपुरात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 02:17 PM2021-05-17T14:17:54+5:302021-05-17T14:18:12+5:30

Chandrapur news जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या नेतृत्वात खतांच्या किंमतीत केलेली ४० टक्के दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारे देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

NCP protests in Chandrapur against hike in prices of chemical fertilizers and essential commodities | रासायनिक खते व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची चंद्रपुरात निदर्शने

रासायनिक खते व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची चंद्रपुरात निदर्शने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंची होणारी दरवाढ, तसेच नुकतीच रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली ४० टक्के दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालया समोर 'शेतकऱ्यांचा एकच नारा रासायनिक खतांची दरवाढ कमी करा', किसानो के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मे', 'महंगा सिलेंडर महंगा तेल मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल', 'मोदी हटओ किसान बचाओ:, असे नारे देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

  केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रासायनिक खतांच्या किमती ४० टक्क्याने  वाढविल्या, त्यामुळे मागील एक वर्षयंपासून कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचे काम केले आहे ,ही दरवाढ तात्काळ कमी करण्याच्या मागणी साठी केंद्र सरकार विरोधात  निषेध करण्यात आला.

यावेळी  जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य,महिला जिहाध्यक्षा सौ बेबीताई उईके,जिल्ह्यातील जेष्ठ नेते  हिराचंद बोरकुटे, जेष्ठ नेते महादेव पीदूरकर , माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, जेष्ठ नेते डी. के. आरिकर, सामाजिक न्यायविभागाचे प्रदेशउपाध्यक्ष सुनील दहेगावकर ,सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगडे, ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष देव कंनाके जिल्हउपाध्यक्ष डॉ आनंद अडबाले, चंद्रपूर तालुका अध्यक्ष शरद मानकर,राजेंद्र आखरे, वंदना आवळे, दिलीप पीट्टूलवार,प्रमोद देशमुख,मनोहर जाधव ओबीसी तालुकाध्यक्ष,पुरुषोत्तम वाघ, देविदास रामटेके, किशोर आवळे,डॉ रमेश वरहाटे, संपत अरेल्ली, सरस्वती गावंडे, सुमित्रा वैद्य, नीता पिंपळकर, असिफ शेख, विठ्ठल पिंपळकर इत्यादी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते  .

Web Title: NCP protests in Chandrapur against hike in prices of chemical fertilizers and essential commodities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.