राष्ट्रवादीला हवे ब्रह्मपुरीसह चंद्रपूर
By admin | Published: June 19, 2014 11:44 PM2014-06-19T23:44:04+5:302014-06-19T23:44:04+5:30
राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने उरले असतानाच जिल्हातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीन विधानसभा मतदार संघावर आपला हक्क सांगितला आहे. तिकडे मुंबईत राकाँतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत
जिल्ह्यात हव्या तीन जागा : राकॉंच्या प्रस्तावाला काँग्रेसचा नकार
गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर
राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने उरले असतानाच जिल्हातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीन विधानसभा मतदार संघावर आपला हक्क सांगितला आहे. तिकडे मुंबईत राकाँतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निवडणुका स्वतंत्र लढायच्या की एकत्रित यावर खल सुरू असताना स्थानिक नेत्यांनी मात्र ही मागणी करून काँग्रेसमधील नेत्यांपुढे प्रश्न उभा केला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीमध्ये जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील जागा सध्या काँग्रेसकडे आहेत. त्यापैकी चंद्रपूर, बल्लारपर आणि ब्रह्मपुरी ता तीन ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत. विशेष म्हणजे या तीन्ही जागेवर राकॉने हक्क सांगितला आहे.
ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातून लढण्यासाठी राकॉचे नेते आणि विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांची तयारी आहे. गेल्या २००९ च्या निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये असताना त्यांनी ही जागा तेथून अपक्ष लढविली होती. नंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला. तेव्हापासून त्यांची तयारी सुरू आहे. ही जागा काँग्रेसने राकॉसाठी सोडावी, यासाठी पक्षाची आग्रही भूमिका आहे.
बल्लारपूर आणि चंद्रपुरातही भाजपाचे आमदार आहेत. या ठिकाणी काँग्रेसला सातत्याने अपयश येत असल्याने ही जागा आम्हाला द्या, अशी राकॉची मागणी आहे. असे असले तरी, काँग्रेस मात्र यासाठी तयार नाही. आगामी निवडणुकीत या दोन्ही पक्षातील युती कायम राहते की तुटते यावरच सर्व काही अवलंबून आहे.