पक्षबांधणीसाठी राष्ट्रवादीची जिल्हास्तरीय आढावा बैठक
By Admin | Published: July 28, 2016 01:35 AM2016-07-28T01:35:52+5:302016-07-28T01:35:52+5:30
महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करीत जिल्हराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हास्तरीय आढावा
चंद्रपूर: महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करीत जिल्हराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हास्तरीय आढावा बैठक बुधवारी कॉन्ट्रक्टर सभागृहात पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका हा या बैठकीतील चर्चेचा मुख्य विषय होता. पक्ष संघटन बांधणी, बुथ निहाय कार्यकर्त्यांवर देण्यात येणारी जवाबदारी निश्चित करण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, सर्व फ्रंटलचे तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच काही नवीन कार्यकर्त्यांवर प्रमुख जवाबदारी देण्यात आली.
पक्षीय आढावा मिळविता यावा, यासाठी तालुका निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली. निरीक्षकांच्या माध्यमातून तालुक्यात होणाऱ्या पक्षासंबंधीच्या कार्यक्रमाची, संघटन बांधणीबाबत जवाबदारी निश्चिती तसेच युती शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या यशस्वीतेची जवाबदारी सोपविण्यात आली.
याप्रसंगी अॅड.मोरेश्वर टेमुर्डे, अॅड.बाबासाहेब वासाडे, राजेंद्र वैद्य, उद्धवराव शिंगाडे, सुदर्शन निमकर, शशीकांत देशकर, महादेव पिदुरकर, हिराचंद्र बोरकुटे, राजीव कक्कड, सुरेश रामगुडे, महिला जिल्हाध्यक्षा बेबी उईके, वरोरा नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे, अरुण निमजे, नितीन मत्ते, नितीन भटारकर, डि. के. आरीकर, विलास नेरकर, सैय्यद अनवर, सतीश मिनगुलवार, गुड्डू खान, पंकज पवार, ज्योती रंगारी, यांच्यासह जिल्हा, तालुका तसेच शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.