अमृत योजनेच्या चौकशीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:31 AM2021-08-13T04:31:55+5:302021-08-13T04:31:55+5:30
चंद्रपूर : शहरातील अमृत योजनेचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करून कंत्राटदाराच्या चौकशीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गुरुवारी दुपारी १२ वाजता ...
चंद्रपूर : शहरातील अमृत योजनेचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करून कंत्राटदाराच्या चौकशीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गुरुवारी दुपारी १२ वाजता मनपासमोर धरणे दिले.
अमृत योजनेच्या ३५४ कोटींचे काम २०१५ मध्ये कंत्राटदाराला देण्यात आले. आज पाच वर्षे होऊनही कंत्राटदाराने काम पूर्ण केले नाही. त्यातही निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले. पाईपलाईन टाकलेल्या भागातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. मनपाच्या भोंगळ कारभारामुळे केंद्र पुरस्कृत योजनेचा निधी वाया जात असल्याचा आरोप चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड यांनी केला. आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभिनव देशपांडे, सुनील काळे, महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे, अश्विनी तालापल्लीवार, वैष्णवी देवतळे, निसार शेख, चेतन धोपटे, विनोद लभाने, नौशाद सिद्दिकी, नयन साखरे, संभाजी खेवले, अब्दुल जमील,मनोज खंडेलवाल, शालीक भोयर, दीपक गोरडवार, प्रवीण जुमडे, राम इंगळे, पूजा शेरकी, आकाश निरटवार व अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.