स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यार्थ्यांविना शाळेत साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:33 AM2021-08-18T04:33:52+5:302021-08-18T04:33:52+5:30

शहरातील शाळा महाविद्यालय बंद होते. ग्रामीण भाग मध्ये ८ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. परंतु कोरोना डेल्टा ...

The nectar festival of freedom is celebrated in schools without students | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यार्थ्यांविना शाळेत साजरा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यार्थ्यांविना शाळेत साजरा

Next

शहरातील शाळा महाविद्यालय बंद होते. ग्रामीण भाग मध्ये ८ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. परंतु कोरोना डेल्टा वायरसचा धोका कायम असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने शाळेतील स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे त्यांची ईच्छा असूनसुद्धा उपस्थित राहता येत नसल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले होते.

कोट

कोरोना डेल्टा व्हायरसचा धोका कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घेत शासनाने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली नाही. परंतु शाळा स्तरावर विविध कार्यक्रमांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन स्वरूपाचे आयोजन करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले होते व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ध्वजसंहिता, कोविड-१९ नियम व सामाजिक बंधन पाळूनच ध्वजारोहण करावे, असा आदेश देण्यात आला होता.

उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (माध्य.),जि.प चंद्रपूर.

Web Title: The nectar festival of freedom is celebrated in schools without students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.