समर्थ भारत घडविण्‍यासाठी सुदृढ होण्‍याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:33 AM2021-08-18T04:33:41+5:302021-08-18T04:33:41+5:30

चंद्रपूर : २०४७ मध्‍ये भारताच्‍या स्‍वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. त्‍यावेळी भारताची पताका संपूर्ण जगात फडकावी, असे आपले सर्वांचे ...

The need to be strong to build a strong India | समर्थ भारत घडविण्‍यासाठी सुदृढ होण्‍याची गरज

समर्थ भारत घडविण्‍यासाठी सुदृढ होण्‍याची गरज

googlenewsNext

चंद्रपूर : २०४७ मध्‍ये भारताच्‍या स्‍वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. त्‍यावेळी भारताची पताका संपूर्ण जगात फडकावी, असे आपले सर्वांचे प्रयत्‍न असावे यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम पिढीची निर्मिती आवश्‍यक असल्याचे मत लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

मूल येथे पै. खाशाबा जाधव जीमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले, न.प. अध्‍यक्षा रत्‍नमाला भोयर, न.प. उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे, पं.स. सभापती चंदू मारगोनवार, मूल शहर भाजपाध्‍यक्ष प्रभाकर भोयर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आ. मुनगंटीवार म्‍हणाले, मिशन शक्‍ती अंतर्गत आपल्‍या जिल्ह्यातील खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत पोहोचावे व त्‍यांनी विविध खेळांमध्‍ये पदके जिंकावी या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यामध्‍ये चंद्रपूर येथे शहीद बाबुराव शेडमाके यांच्‍या नावाने स्‍टेडियम तयार होत आहे. तसेच चंद्रपूरच्‍या जिल्‍हा स्‍टेडियमसाठीसुद्धा भरीव निधी दिला. त्‍या व्‍यतिरिक्‍त बल्‍लारपूर तालुक्‍यात विसापूर येथे आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे स्‍टेडियम अंदाजे ३० कोटी रु. खर्च करून बांधण्‍यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी नगरसेवक प्रशांत समर्थ, अनिल साखरकर, महेंद्र करकाडे, शांताबाई मांदाडे, प्रशांत लाडवे, मिलिंद खोब्रागडे, वनमाला कोडापे, विद्या बोबाटे, रेखा येरणे, आशा गुप्‍ता, प्रशांत लाडवे, संगीता वाळके, वंदना वाकडे, विनोद सिडाम, प्रभा चौथाले, मनीषा गांडलेवार, चंद्रकांत आष्‍टनकर, अजय गोगुलवार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The need to be strong to build a strong India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.