गुगल नकाशातील चुका सुधारण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:29 AM2021-07-30T04:29:32+5:302021-07-30T04:29:32+5:30
कोरपना : तालुक्यातील अनेक गावांचे गुगल मॅपमध्ये लोकेशन चुकीच्या ठिकाणी दर्शविले आहे. त्यामुळे चुकीची माहिती नागरिकांना प्रसारित होत ...
कोरपना : तालुक्यातील अनेक गावांचे गुगल मॅपमध्ये लोकेशन चुकीच्या ठिकाणी दर्शविले आहे. त्यामुळे चुकीची माहिती नागरिकांना प्रसारित होत आहे. ठिकाणाच्या अचूक लोकेशननुसार सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
यामध्ये अकोला, पारडी, मेहंदी, सावलहिरा, मांगलहिरा, जांभुळधरा, उमरहिरा, टांगाला, सिंगारपठार, चनई, खैरगाव, हातलोनी, येरगव्हाण, कुकुडबोडी, केरामबोडी आदी गावांचे लोकेशन चुकीच्या ठिकाणी दर्शविले आहे. कन्हाळगाव गावचे लोकेशन दोन ठिकाणी दर्शविले आहे. त्यामुळे मॅपच्या सहाय्याने प्रवास करणाऱ्या व माहिती घेणाऱ्या नवीन व्यक्तिंना चुकीची माहिती मिळत आहे. यातून अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. बऱ्याच दिवसांपासून कोरपना भागातील गुगल मॅपचे नवीन अपडेट झालेले नाही. परिणामी नवीन स्थाने व बदल यात दिसून येत नाहीत. या अनुषंगाने गुगल नकाशातील चुका सुधारण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.