राजकारणात दादासाहेबांच्या विचारांची गरज- ठाकरे

By admin | Published: September 24, 2015 01:07 AM2015-09-24T01:07:40+5:302015-09-24T01:07:40+5:30

माजी मंत्री लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या तालमीत तयार झाले होते.

Need of Dadasaheb's Politics in Politics - Thackeray | राजकारणात दादासाहेबांच्या विचारांची गरज- ठाकरे

राजकारणात दादासाहेबांच्या विचारांची गरज- ठाकरे

Next

वरोऱ्यात कार्यक्रम : शब्दसुमनांनी दिली आदरांजली
वरोरा : माजी मंत्री लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या तालमीत तयार झाले होते. त्यांच्यावर सर्वोदयी विचारांचा मोठा प्रभाव होता. निर्गवी, निस्वार्थी व लोकांमध्ये मिसळून लोकांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची हातोटी व त्यांच्या विचारांची राजकारणात आजही गरज आहे, असे प्रतिपादन यवतमाळचे माजी खासदार सदाशिव ठाकरे यांनी केले.
मंगळवारी आयोजित स्व. देवतळे यांच्या २९ व्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे म्हणाले, स्व. दादासाहेब देवतळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा राजकीय वारसा पुत्र डॉ. विजय यांनी पुढे चालवावा, याबाबत आपण स्वत: दादासाहेब यांच्या पत्नीशी चर्चा केली होती. परंतु पुतणे संजय देवतळे यांची स्वत: राजकारणात येण्याची इच्छा लक्षात घेऊन त्यांनी स्वत:च्या पुत्राऐवजी संजय देवतळे यांच्यासाठी होकार दिला होता. त्यामुळे त्यावेळी डॉ. विजय देवतळे यांचा राजकारणातील प्रवेश थांबला होता, असा खुलासा त्यांनी याप्रसंगी केला.
वरोरा नगरपरिषदेच्या अध्यक्षा जनाबाई पिंपळशेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात माजी खासदार नरेश पुगलिया, स्व. दादासाहेब देवतळे मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे, डॉ. आसावरी देवतळे, वरोरा पंचायत समितीचे सभापती सुनंदा जीवतोडे, उपसभापती गजानन चांदेकर, आडकुजी पाटील नन्नावरे, रवींद्र शिंदे, डॉ. सुरेश महाकुलकर, अशोक नागपुरे, प्राध्यापक भोंग, लक्ष्मण गमे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी माजी खासदार नरेश पुगलिया यांनीही स्व. देवतळे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
प्रास्ताविक डॉ. विजय देवतळे यांनी केले. स्व. दादासाहेब देवतळे मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्टद्वारे आयोजित आशिर्वाद मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील कामगिरीबाबत अ‍ॅड. जयवंत काकडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक हरिचंद्र ढोबळे व प्रगतशिल शेतकरी मधुकर भलमे या तीन पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचे पुष्पहाराने पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. माजी नगराध्यक्ष विलास टिपले, नगरसेवक छोटुभाई शेख, रंजना पुरी, दर्शना मडावी, कन्हैयालाल जैस्वाल, पुरुषोत्तम निखाडे, साहेबराव ठाकरे, अनिल चौधरी, आसिफ रजा, गोठीजी, सोमदेव कोहाड, कापकर याप्रसंगी उपस्थित होते. संचालन प्रा. प्रशांत खुळे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Need of Dadasaheb's Politics in Politics - Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.