सामाजिक कृतज्ञेतून वनसंवर्धनाची गरज

By admin | Published: June 6, 2017 12:41 AM2017-06-06T00:41:23+5:302017-06-06T00:41:23+5:30

निसर्गाने मानवाला खूप काही दिले आहे. त्याविषयी कृतज्ञतेच्या जाणिवेतून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पर्यावरण व निसर्ग समृध्द ठेवणे,...

The need for forestry from social gratitude | सामाजिक कृतज्ञेतून वनसंवर्धनाची गरज

सामाजिक कृतज्ञेतून वनसंवर्धनाची गरज

Next

प्रभाकर मामूलकर : वृक्षदिंडी व सत्कार सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा: निसर्गाने मानवाला खूप काही दिले आहे. त्याविषयी कृतज्ञतेच्या जाणिवेतून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पर्यावरण व निसर्ग समृध्द ठेवणे, त्याचे संवर्धन करणे हे मानवी जीवनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. आपण विकासाच्या दिशेने प्रगतिपथावर वाटचाल करू लागलो, पण निसर्गाची आणि पर्यावरणाची मात्र हेडसांड झाली आहे. त्यामुळे सामाजिक कृतज्ञता बाळगून वनसंवर्धनाची गरज आहे. असे प्रतिपादन प्रभाकर मामूलकर यांनी केले.
श्री शिवाजी महाविद्यालय राजूरा आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात ‘वनसंवर्धन काळाची गरज’ या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक मेडपल्लीवार, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे, सीडीसीसी बँकेचे संचालक दिलीप नलगे, रेखा पहानपटे, बबन जानवे, कवडू चहारे, वडस्कर, मुख्याध्यापक एस. आर. निब्रड, प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड, उपप्राचार्य सुधाकर धांडे, संचालक साजिद बियाबानी, वनअधिकारी आर.एस.घुग्लोत, एस. के. धांडे, एम.आर. गोविंदवार आदी उपस्थित होते. यावेळी शिवाणी किल्लारे, स्नेहल टेभुर्णे, मयुर चव्हाण, सुरज दहागावकर, कविता अडवे, जयश्री अनमुलवार, साक्षी राजुलवार, अश्विनी चेनुरवार, शबाना शेख, कविता दुर्गे, सपना आत्राम, राकेश वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: The need for forestry from social gratitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.