धानावर आधारिक उद्योगाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:24 AM2021-01-04T04:24:55+5:302021-01-04T04:24:55+5:30
रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी कोरपना : तालुक्यातील अनेक गावांची व गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती ...
रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
कोरपना : तालुक्यातील अनेक गावांची व गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सावलहिरा, येन्सापूर, कारगाव, जिवती, पिपरी, नारंडा बाखर्डी, नांदा, इरई कवठाळा आवारपूर, विरूर, लोणी, नारंडा, आदी गावांच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रेडीयमअभावी अपघाताची शक्यता
गडचांदूर : गडचांदूर-आदिलाबाद मार्गावर रेडीयम पट्ट्या नसल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यावर किमान रेडीयम पट्ट्या लावाव्या, अशी मागणी करण्यात आली आहे.
विरंगुळा केंद्र सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी तुळशीनगरात जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवर नामफलकाशिवाय काहीच नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या केंद्रात सुविधा पुरवून केंद्र अद्ययावत करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्ता दुभाजकाची दुरवस्था
चंद्रपूर : पडोली परिसरात असलेल्या रस्ता दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी झुडपे वाढले असून, कडेला मोठ्या प्रमाणात माती साचली आहे. त्यामुळे या परिसरात अपघाताची शक्यता आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
पाणंद रस्ते झाले निमूळते
चंद्रपूर : परिसरात असलेल्या गावातील पाणंद रस्ते अगदीच निमूळते झाले आहे. विशेष म्हणजे, काही शेतकऱ्यांनी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरच कुंपन केल्यामुळे अन्य शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. संबंधितांनी लक्ष देऊन शेताकडे जाणारे रस्ते मोकळे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शाळांच्या मेसेजमुळे पालक त्रस्त
चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी अद्यापही शाळा सुरू झाल्या नाही. काही शाळांचे शिक्षक ऑनलाईन अभ्यासक्रम घेत आहेत, तर काही शिक्षक मोबाईलवर मॅसेज पाठवून मोकळे होत आहे. शिक्षकांच्या मॅसेजमुळे आता पालक वैतागले आहे. विशेष म्हणजे, मोबाईल मुलाजवळ राहत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
सायकलने फिरणाऱ्यांची संख्या वाढली
चंद्रपूर : कोरोनामुळे नागरिक शारीरिक तंदुरुस्तीसाठी आता सायकलने फिरण्याकडे वळले आहे. चंद्रपूर-नागपूर या रस्त्यासह चंद्रपूर-मूल, बल्लारपूर या रस्त्यावरही पहाटेच्या सुमारास मोठ्या संख्येने नागरिक सायकलने फिरण्यासाठी निघत आहेत. त्यामुळे चंद्रपूर शहरात सायकल ट्रॅक तयार करण्याची मागणी केली जात आहे.
-
उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
चंद्रपूर : येथील वरोरा नाका परिसरात नव्याने उड्डाण पूल बांधण्यात आले आहे. मात्र, अद्यापही सुरू करण्यात आले नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. वाहतूक पोलीस कार्यालयाकडून येणाऱ्या पुलावरून थेट आंबेडकर कॉलेजपर्यंत या पुलामुळे येता येणार आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असतानाही पूल सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे त्वरित पूल सुरू करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.