स्वच्छता अभियान राबविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:08+5:302021-06-11T04:20:08+5:30
ग्रामीण भागात स्वच्छता अभियान केवळ कागदावरच चंद्रपूर : सध्या गावखेड्यात, तसेच शहरात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. ग्रामीण ...
ग्रामीण भागात स्वच्छता अभियान केवळ कागदावरच
चंद्रपूर : सध्या गावखेड्यात, तसेच शहरात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. ग्रामीण भागात घरोघरी शौचालय बांधण्यासाठी शासनाने अनुदान दिले. मात्र, अनेकांनी थातूरमातूर शौचालय बांधून केवळ अनुदानाची रक्कम लाटली आहे. अनेक गावांपासून एक किलोमीटर अंतरापर्यंतच्या मार्गावरच प्रातर्विधी आटोपले जात आहे. प्रवास करताना कोणतेही गाव आल्यानंतर नागरिकांना नाकाला रूमाल लावावा लागतो.
काम नसल्याने बेरोजगारांमध्ये नैराश्य
चंद्रपूर : जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे तरुणांना शेती व्यवसायाकडेदेखील वळता येत नाही. अनेक युवक उच्चशिक्षित असतानादेखील अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्य आले आहे. अनेक उद्योगधंदे संकटात असल्याने बेरोजगारी वाढत असून, अनेक सुशिक्षित तरुणाांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. हाताला काम नसल्याने अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे. दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि निसर्गाचे संतुलन बिघडत चालल्याने त्याचा परिणाम बेकारीच्या संख्येत वाढ होत आहे.