स्वयंस्फुर्तीने निर्बंध घालण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:35 AM2021-06-09T04:35:53+5:302021-06-09T04:35:53+5:30

पालकमंत्री : क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये घेतला कोरोनाचा आढावा चंद्रपूर : जिल्ह्याचा पहिल्या स्तरामध्ये समावेश असला आणि निर्बंध काही प्रमाणात शिथिल ...

The need to impose restrictions spontaneously | स्वयंस्फुर्तीने निर्बंध घालण्याची गरज

स्वयंस्फुर्तीने निर्बंध घालण्याची गरज

Next

पालकमंत्री : क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये घेतला कोरोनाचा आढावा

चंद्रपूर : जिल्ह्याचा पहिल्या स्तरामध्ये समावेश असला आणि निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी हा स्तर कायम राखण्यासाठी, आणखी कमी करण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे. अन्यथा पूर्ववत स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने काही निर्बंध घालण्याची गरज आहे. यंत्रणेने यात ढिलाई करू नये. शासनस्तरावरून प्रत्येक आठवड्याचा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर तपासण्यात येत आहे. त्यानुसारच जिल्ह्याबाबत काय निर्णय घ्यायचे, हे निश्चित होते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याबाबत अतिशय गांभीर्यपूर्वक वर्तणूक करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

येथील क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये कोरोना विषयक त्यांनी आढावा घेतला. यावेळी खासदार सुरेश धानोरकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,आमदार नाना पटोले, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, क्राईस्ट हॉस्पीटलचे फादर जोसेफ जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी आ. नाना पटोले यांनी कोविड विषयाबाबत जिल्ह्याची माहिती जाणून घेतली. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच एकदम शेवटच्या तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य विषयक सुविधा व्यवस्थित ठेवाव्यात, अशा सुचना त्यांनी केल्या.

याप्रसंगी जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, शहरी व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये-५-५ऑक्सिजन बेडची व्यवस्था तसेच प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन पाईपलाईनचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.संचालन हॉस्पिटलचे फादर जोसेफ जोशी यांनी केले. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स तसेच विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

बाॅक्स

म्युकरमायकोसिसचे ८८ रुग्ण

म्युकरमायकोसिसचे ८८ रुग्ण आढळले असून ५३ जणांवर सद्यस्थितीत उपचार सुरू आहे. तर ३३ जणांना सुटी देण्यात आली. दोन रुग्णांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यु झाला. म्युकरमायकोसिसच्या ३५ रुग्णांना एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने संबंधित रुग्णांना खनिज विकास निधीतून पाच लक्ष रुपयांपर्यंतचे इंजेक्शन मोफत देण्यात आले. म्युकरमायकोसिस आणि संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात लहान बालकांच्या संरक्षणासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सचे गठन करण्यात आल्याचे शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी यावेळी माहिती दिली.

Web Title: The need to impose restrictions spontaneously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.